नवी दिल्ली : ‘पर्ल्स’ ग्रुपचा थोडा थोडका नव्हे तर तब्बल 45 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. या गैरव्यवहार प्रकरणात रथी महारथींना जबरजस्त झटका बसण्याची शक्यता आहे. भारताचे दोन तर ऑस्ट्रेलियाचा एक स्टार क्रिकेटरदेखील या प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर या ग्रुपपासून लाभ घेतलेल्या सर्व मंडळींची यादीही अंमलबजावणी संचलनालय आणि सीबीआयने तयार केली आहे.
ईडी आणि सीबीआयने तयार केलेल्या या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजनसिंग आणि धडाकेबाज फलंदाज युवराजसिंग या दोघांचा तर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी लवकरच या सर्वांची चौकशी होणार असल्याचे सुत्रांकडून समजते.
काय आहे नेमके प्रकरण
पर्ल्स ग्रुपकडून युवराजसिंग आणि हरभजनसिंग यांना प्लॉट मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर, हे प्लॉट मोहाली येथे असल्याचे बोलले जात आहे. तर ब्रेट ली हा ऑस्ट्रेलियात पर्ल्स ग्रुपच्या हॉटेल्सचा ब्रॅण्ड अम्बेसेडर असल्याचे दिसून आले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाली युवीची आई...