आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Personal Life Of 19 Yr Old Rishabh Panth Who Purchased Mercedes By His Own

19 वर्षे वयातच विकत घेतली मर्सिडीझ, अशी आहे या भारतीय क्रिकेटपटूची LIFE...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्रांसमवेत ऋषभ. - Divya Marathi
मित्रांसमवेत ऋषभ.
स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर होणाऱ्या टीम इंडियाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. 23 जूनपासून सुरू होणाऱ्या या टूरसाठी आयपीएलमध्ये जबरदस्त परफॉर्म करणाऱ्या 19वर्षीय ऋषभ पंतला भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. ऋषभ पंतच्या खासगी आयुष्यातील काही इंटरेस्टिंग बाबी आणि फोटोज divyamarathi.com खास क्रिकेट चाहत्यांसाठी शेअर करत आहे.
 
वयाच्या 19व्या वर्षात मर्सिडीझ विकत घेतली...
- अवघ्या 19 वर्षे वयातच मर्सिडीझ विकत घेणाऱ्या ऋषभच्या उज्ज्वल क्रिकेट करिअरचा अंदाज कुणालाही लावता येईल. या कारची किंमत 1 कोटी रुपये आहे. आयपीएल 2016 मध्ये 10 लाख बेस प्राइस असलेल्या ऋषभला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1.9 कोटी रुपयांत संघात घेतले होते.
-ऋषभनेही दिल्लीला निराश नाही केले. शानदार यष्टिरक्षणसह त्याने दोन्ही मोसमांतील 24 सामन्यांत तब्बल 564 धावा केल्या. यात त्याचा टॉप स्कोअर 97 धावांचा आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा ऋषभ पंतच्या खासगी आयुष्यातील काही फोटोज आणि काही फॅक्ट्स... 
बातम्या आणखी आहेत...