आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीटरसन-प्रिंसची तब्बल ५०१ धावांची विक्रमी भागीदारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम बनला आहे. द. आफ्रिकेचे तारे आल्विरो पीटरसन आणि अॅश्ले प्रिंस हे दोघे विक्रमवीर ठरले आहेत. या दोघांनी सेकंड डिव्हिजनच्या एका सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी ५०१ धावांची भागीदारी करून नवा इतिहास रचला आहे. हे दोघे लँकेशायरकडून खेळत आहेत. दोघांनी ग्लॅमरगनविरुद्ध ही कामगिरी केली. पीटरसनने शानदार फलंदाजी करताना २८६ धावा काढल्या, प्रिंसने प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजीचा समाचार घेत २६१ धावा ठोकल्या.

अशी झाली भागीदारी
लँकेशायरकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास आलेल्या पीटरसनने २८६ धावा ठोकल्या. यात त्याने ३५ चौकार आणि २ षटकार मारले, तर प्रिंसने २६१ धावांच्या खेळीत ३५ चौकार आणि ७ षटकार खेचले. कार्ल ब्रायनने ५४, तर कर्णधार क्रॉफ्टने नाबाद ५७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर लँकेशायरने ५ बाद ६९८ धावांचा डोंगर उभा करून डाव घोषित केला. चार दिवसांच्या या सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ग्लॅमरगनने ६ बाद १७२ धावा काढल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ...असे पहिल्यांदा घडले
बातम्या आणखी आहेत...