आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • PHOTOS: Glenn Maxwell Best Innings 145 Runs On 62 Balls Australia V Sri Lanka 2016 At Pallekele

T- 20 मध्ये मॅक्सवेल नावाचे नवे वादळ, पाहा 145 धावांच्या खेळीचा रोमांच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅक्सवेलने 26 चेंडूत षटकारासह अर्धशतक ठोकले तर पुढील 50 धावा त्याने अवघ्या 23 धावात काढल्या. - Divya Marathi
मॅक्सवेलने 26 चेंडूत षटकारासह अर्धशतक ठोकले तर पुढील 50 धावा त्याने अवघ्या 23 धावात काढल्या.
स्पोर्ट्स डेस्क- अनेक महिन्यापासून खराब कामगिरी करीत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने अखेर श्रीलंकेविरोधात कमाल दाखवली. पहिल्या टी- 20 लढतीत मॅक्लवेलने श्रीलंकेच्या बॉलरची जोरदार धुलाई करताना चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने केवळ 65 चेंडूत 14 चौकार आणि 9 षटकारांसह नाबाद 145 धावा ठोकल्या. त्याच्या करिअरमधील हे पहिलेच टी 20 शतक आहे. अखेर मॅक्सवेल चमकला...

- ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 145 धावा करून ऑस्ट्रेलियाच्या नावावर विक्रम नोंदवला.
- गेली एक-दीड वर्षे त्याची कामगिरी खराब होत होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघातून त्याला डच्चू मिळतोय की काय असे बोलले जात होते.
- केवळ देशाकडूनच खेळताना त्याचा फॉर्म हरपला नव्हता तर आयपीएल-9 मध्ये पंजाब संघाकडून खेळताना त्याची सर्वात खराब कामगिरी झाली होती. याचमुळे पंजाब संघाला शेवटचे स्थान मिळाले होते.
- मात्र, श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच टी-20 सामन्यात एक वेगळाच मॅक्सवेल पाहायला मिळाला. तो प्रथमच सलामीला खेळायला आला होता.
- पहिल्या षटकापासून त्याने गनप्रमाणे बॅटिंग फिरवायला सुरुवात केली.
- मॅक्सवेलने 26 चेंडूत षटकारासह अर्धशतक ठोकले तर पुढील 50 धावा त्याने अवघ्या 23 धावात काढल्या.
- हे टी 20 करियरमधील त्याचे पहिलेच शतक ठरले, जे त्याने 49 चेंडूत पूर्ण केले.
- मॅक्सवेलच्या दमदार खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाला टी- 20 मधील सर्वोच्च धावसंख्या (263 धावा) उभारता आल्या.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, मॅक्सवेलच्या जबरदस्त इनिंगचा रोमांच...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...