आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • PM Narendra Modi Arrive At Harbhajan Singh And Geeta\'s Wedding Reception

भज्जी-गीतासह रोहितनेही मारले ठुमके, पाहा रिसेप्शनला पोहोचले हे दिग्गज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- क्रिकेटर हरभजनसिंग आणि गीता बसरा यांचे ग्रॅन्ड वेडिंग रिसेप्शन रविवारी रात्रि दिल्ली येथील हॉटेल ताजमध्ये पार पडले. या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पीएम मनमोहनसिंग, भारताच्या वन डे आणि टी-20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, स्टार क्रिकेटर युवराजसिंगसह अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले होते. या वेळी मोदी जास्त वेळ थांबू शकले नाही. हरभजन-गीताला शुभेच्छा देऊन ते निघून गेले.
हरभजन आणि गीताचा विवाह 29 ऑक्टोबरला जालंधरमध्ये झाला. या वेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह आणि इंडस्ट्रियलिस्ट मुकेश अंबानी हे उपस्थित होते.
हरभजन-गीताचा कसा होता लूक
रिसेप्शनमध्ये हरभजनने वेलवेटवर एम्ब्रॉयडरी केलेली शेरवानी तर गीताने ब्लू मिरर वर्क असलेला लहंगा परिधान केला होता. या दोघांचेही ड्रेस अर्चना कोच्चरने डिझाइन केले होते. तर वडोदरा येथील ज्वेलर्सने दोघांसाठी ज्वेलरी डिझाइन केली होती.
रिसेप्शनला आले होते हे VIP मंडळी
- भज्जीच्या या ग्रॅन्ड रिसेप्शनला साधारणपणे 1000 हून अधिक पाहुणे पोहोचले होते. या कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ रविवारी उशिरापर्यं सुरूच होती.
- रिसेप्शनला भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळे सर्वात पहिले पोहोचला. त्याच्यासह पत्नी चेतनादेखील होती.
- त्याच्या नंतर क्रिकेटर आर. अश्विनही पत्नी प्रीतिसह पोहोचला.
- अश्विननंतर अजिंक्य रहाणे पत्नी राधिकासह आणि आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्लादेखील पत्नी अनुराधासह पोहोचले.
- पीएम नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग देखील पत्नी गुरशरण कौरसह पोहोचले.
युवी रणजी मॅच सोडून पोहोचला तर धोनी पोहोचला पत्नी सह
- रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी युवराजसिंग तर चक्क रणजी मॅच सोडून पोहोचला होता.
- धोनी पत्नी साक्षीसह पोहोचला. या नंतर साक्षीने सेल्फीदेखील पोस्ट केला होता.
- नुकतीच निवृत्ती जाहिर केलेला वीरेंद्र सेहवागही पत्नी आरतीसह पोहोचला.
- धोनीसह मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवि शास्त्री, मुनाफ पटेल, कपिल देव देखाल या रिसेप्शनसाठी पोहोचले होते.
- पंजाब पोलिसचे माजी महानिदेशक आणि प्रतिबंधित भारतीय हॉकी फेडरेशनचे माजी चेअरमन केपीएस गिलदेखील यावेळी पोहोचले होते.

- फोटो : भूपिंदरसिंग/ट्विटर/एजन्सी

पुढील स्लाइड्सवर पाहा, हरभजनसिंग आणि गीता बसराच्या रिसेप्शनचे काही खास फोटो...