आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRH vs KXIP: वाॅर्नरचा मॅक्सवेलला दणका; हैदराबाद विजयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - कर्णधार डेव्हिड वाॅर्नर (नाबाद ७०) अाणि भुवनेश्वर कुमार (५/१९) यांनी यजमान सनरायझर्स हैदराबादला अायपीएलमध्ये शानदार विजय मिळवून दिला. यजमान हैदराबादने घरच्या मैदानावर साेमवारी ग्लेन मॅक्सवेलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर ५ धावांनी मात केली. हैदराबादचा हा तिसरा विजय ठरला. पंजाबला तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.  
 
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ६ गडी गमावून १५९ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात पंजाबने १९.४ षटकांत १५४ धावांत गाशा गुंडाळला.
मननची झुंज अपयशी :  पंजाबकडून मनन वाेहराने एकाकी झंुज देताना ९५ धावांची खेळी केली. मात्र, त्याला टीमचा पराभव या टाळता अाला नाही. कर्णधार मॅक्सवेलने १०, माेर्गनने १३ धावांची खेळी केली.
 
भुवनेश्वरची धारदार गाेलंदाजी: हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने धारदार गाेलंदाजी केली. त्याने ४ षटकांत १९ धावा देताना ५ विकेट घेतल्या. याशिवाय रशीद खानने २, सिद्धार्थ काैल, नबी अाणि हेनरिक्सने प्रत्येकी एक गडी बाद केला.
 
नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या सलामीवीर व कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने शिखर धवनसाेबत हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली. माेहित शर्माने  शिखर धवनला (१५) बाद केले. त्यापाठाेपाठ हेनरिक्स (९) झटपट बाद झाला. स्फाेटक फलंदाज युवराज भाेपळा न फाेडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. पंजाबकडून माेहित व अक्षर पटेलने धारदार गाेलंदाजी करताना प्रत्येकी २ विकेट घेतल्या. संदीप शर्मा व करियप्पाने प्रत्येकी १ गडी बाद केला.   

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद    धावा     चेंडू     ४    ६
डेव्हिड वाॅर्नर नाबाद     ७०    ५४    ०७    २
धवन झे. साहा गाे. माेहित    १५    १५    ०१    ०
हेनरीक्स यष्टी. साहा गाे. अक्षर    ०९    १६    ००    ०
युवराज यष्टी. साहा गाेे. अक्षर    ००    ०१    ००    ०
अाेझा यष्टी. साहा गाे.करियप्पा    ३४    २०    ०२    १
हुडा झे.संदीप गाे. माेहित     १२    १०    ०१    ०
नबी झे. मिलर गाे. संदीप शर्मा    ०२    ०३    ००    ०
रशीद खान नाबाद    ०६    ०१    ००    १
अवांतर : ११. एकूण : २० षटकांत ६ बाद १५९ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२५, २-५०, ३-५०, ४-११०, ५-१४०, ६-१४६. गोलंदाजी : संदीप शर्मा ४-०-३५-१, इशांत शर्मा ४-०-२३-०, माेहित शर्मा ४-०-२५-२, के.सी. करियप्पा ४-०-३८-१, अक्षर पटेल ४-०-३३-२.
 
किंग्ज इलेव्हन पंजाब    धावा     चेंडू     ४    ६
अामला पायचीत गाे. भुवनेश्वर    ००    ०१    ००    ०
वाेहरा पायचीत गाे. भुवनेश्वर    ९५    ५०    ०९    ५
मॅक्सवेल झे. वाॅर्नर गाे. भुवन     १०    १२    ०२    ०
इयान माेर्गन त्रि. गाे. नबी    १३    १७    ००    १
डेव्हिड मिलर त्रि.गो. रशीद     ०१     ०६    ००    ०
वृद्धिमान साहा त्रि.गो. रशीद    ००    ०२    ००    ०
अक्षर झे. धवन गो. हेनरिक्स    ०७    १२    ००    ०
मोहित झे. धवन गो. भुवनेश्वर    १०    ०५    ००    ०
करिअप्पा त्रि. गो. भुवनेश्वर     ०१    ०५    ००    ०
इशांत शर्मा त्रि. गो. कौल    ०२    ०५    ००    ०
संदीप शर्मा नाबाद     ०५    ०४     ००    ०

अवांतर : १०. एकूण : १९.४ षटकांत सर्वबाद १५४ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-५, २-१९, ३-२१, ४-१३१, ५-१५२, ६-१६०. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-१९-५, सरण २-०-२९-०, सिद्धार्थ कौल ३.४-०-२६-१, नबी ४-०-२८-१, रशीद खान ४-०-४२-२, हेनरिक्स २-०-६-१.
सामनावीर : भुवनेश्वर कुमार
 
 
बातम्या आणखी आहेत...