आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Portugal\'s Forward Cristiano Ronaldo Injured During Poland V Portugal Match

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS:दुखापतीने विवळत होता रोनाल्डो, तरीही संघाला पराभूत नाही होऊ दिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टक्कर मारल्यानंतर मैदानात विवळत पडलेला रोनाल्डो... - Divya Marathi
टक्कर मारल्यानंतर मैदानात विवळत पडलेला रोनाल्डो...
मार्सिल- आपली टीम पोर्तगालला युरो कप 2016 च्या सेमीफायनलमध्ये नेणा-या स्टार फुटबॉलर रोनाल्डोला मॅचदरम्यान विरोधी संघातील खेळाडूने जबरदस्त टक्कर मारली. सामन्याच्या अतिरिक्त वेळेच्या ( एक्स्ट्रा टाइम) आधी ही घटना घडली. जखमी झालेल्या रोनोल्डोने यानंतरही शानदार गोल करीत आपल्या संघाला 5-3 असा रोमांचक विजय मिळवून दिला.
रेफरीने नाही केली कारवाई...
- रोनाल्डोला पोलंडच्या खेळाडूने पायाला टाचेच्या शिरेवर लाथ मारली.
- यानंतर रोनाल्डो जमिनीवर कोसळला. जबरदस्त मुका मार लागल्याने तो मैदानात विवळत पडला. त्याला मैदानाबाहेर जावे लागले.
- मात्र, रेफरीला यात काहीही चुकीचे वाटले नाही. रेफरीने पोलंडच्या खेळाडूवर कोणतेही कारवाई केली नाही.
- यानंतर रोनाल्डोवर फर्स्ट ऐड (प्राथमिक उपचार) करण्यात आले. काही वेळ बाहेर थांबल्यावर रोनाल्डो पुन्हा एकदा मैदानात परतला.
जबरदस्त गोल करून मिळवला विजय
- रोनाल्डोने पेनल्टी शूटआउटवर जबरदस्त किक मारत बॉलला जाळीत धाडले.
- मॅचच्या निर्धारित 90 मिनिट आणि पुन्हा अतिरिक्त वेळेत (एक्स्ट्रा टाइम) दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.
- यानंतर पेनल्टी शूटआउटची मदत घेण्यात आली.
- टीमसाठी पहिला शॉट रोनाल्डोने घेतला व गोल करण्यास कोणतेही चूक केली नाही.
- शूटआउटमध्ये पोलंडच्या जाकुब ब्लास्चेकोवस्की चौथ्या पेनल्टी शॉटला गोलमध्ये परावर्तित करू शकला नाही.
- त्याचा शॉट पुर्तगालचा तेजतर्रार गोलकीपर रुई पट्रिसियोने हवेत छेप घेत रोखला.
- सेमीफायनलमध्ये आता पोर्तगालची गाठ बेल्जियम आणि वेल्स यांच्यातील विजेत्या संघासोबत होईल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिस्टियानो रोनाल्डोला दुखापत झाली त्यादरम्यानचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...