आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेनदिवसीय सराव सामना; राहुलचे झंझावाती अर्धशतक; कुलदीपचा ‘बळींचा’ चाैकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे- टीम इंडियाचा युवा गाेलंदाज कुलदीप यादव (४/१४), रवींद्र जडेजा (३/३१) अाणि माे. शमीने (२/९) धारदार गाेलंदाजी करताना दाेनदिवसीय सराव सामन्यात यजमान श्रीलंका अध्यक्षीय संघाचे पहिल्या डावात कंबरडे माेडले. या धारदार गाेलंदाजीमुळे यजमानांना १८७ धावांत अापला पहिला डाव गुंडाळावा लागला. प्रत्युत्तरात लाेकेश राहुलच्या (५३) झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. यासह भारताने पहिल्या दिवसअखेर ३ गड्यांच्या माेबदल्यात १३५ धावा काढल्या. अद्याप ५२ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाकडे सात विकेट अाहेत. दिवसअखेर टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली (३४) अाणि अजिंक्य रहाणे (३०) ही जाेडी मैदानावर खेळत अाहेत.  अध्यक्षीय संघाकडून फर्नांडाेने दाेन विकेट घेतल्या. मात्र, लाेकेश राहुलने गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना शानदार अर्धशतक ठाेकले.     

नाणेफेक जिंकून अध्यक्षीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीचा सिल्वा (४) स्वस्तात बाद झाला.  गुणथिलकाने (७४) थिरीमानेसाेबत (५९)  संघाचा डाव सावरला. या दाेघांनी दुसऱ्या गड्यासाठी १३० धावांची माेठी भागीदारी रचली अाणि टीमच्या धावसंख्येला गती दिली. 

कुलदीप चमकला
भारतीय संघाकडून कुलदीप यादव, रवींद्र जडेजाने धारदार गाेलंदाजी केली. त्यांनी यजमान अध्यक्षीयचा निम्मा संघ तंबूत पाठवला. यात कुलदीपने चार विकेट घेतल्या. त्यापाठाेपाठ रवींद्र जडेजाने तीन बळी घेतले. तसेच शमीनेही शानदार गाेलंदाजी करताना यजमानांच्या दाेन अव्वल फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.   

राहुलची फटकेबाजी
सराव सामन्यात भारताचा युवा फलंदाज लाेकेश राहुल चमकला. त्याने मिळालेल्या संधीचे साेने करताना शानदार संघाला पहिल्या डावात चांगली सुरुवात करून दिली. यादरम्यान त्याने वैयक्तिक अर्धशतकी खेळी केली. त्याने ५८ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकारांच्या अाधारे ५४ धावा काढल्या. यातून त्याने संघाच्या धावसंख्येला गती दिली. दरम्यान, अभिनव मुकुंद अापल्या पावलीच तंबूत परतला. त्यानंतर पुजाराने १२ धावांचे याेगदान दिले. त्यालाही फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवता अाले नाही.
बातम्या आणखी आहेत...