आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या हाती बॅट, अन्य गोष्टींबाबत मी निर्णय घेत नाही, घेऊ शकत नाही- विराट कोहली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अनिल कुंबळेंचा प्रशिक्षक म्हणून राजीनामा आणि त्यानंतर रवी शास्त्री यांच्या निवडीनंतरही गोलंदाजी व फलंदाजीच्या प्रशिक्षक निवडीचे नाट्य या पार्श्वभूमीवर भारताचा क्रिकेट संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना झाला. कामगिरी करताना दडपण येणार का, यावर उत्तर देताना विराट कोहली म्हणाला, ‘माझ्या हातात बॅट आहे. ती एकमेव गोष्ट माझ्या नियंत्रणातील आहे. अन्य गोष्टींबाबत मी निर्णय घेत नाही, घेऊ शकत नाही. गेल्या श्रीलंका दौऱ्यावर पहिलीच कसोटी हरल्यामुळे धक्का बसला होता. मात्र, या वेळी आम्ही सर्व प्रकारच्या अनुभवाने परिपक्व होऊन तेथे जात आहोत. परदेशातील विजय मिळवायला आम्ही सुरुवात केली आहे,’असे कोहलीने या वेळी म्हटले. 

गोलंदाजी कोच म्हण्ून अरुण याला मी पसंती दिली, कारण गेली १५ वर्षे तो प्रशिक्षण क्षेत्रात आहे. माझ्यापेक्षा तोच खेळाडूंना अधिक जवळून जाणतो. त्यामुळे त्याच्या निवडीला माझे समर्थन आहे, असे शास्त्री यांनी सांगितले.

शास्त्रींसह अडचण नाही
कोच’ची प्रशिक्षण पद्धती शास्त्रींच्या बाबतीत तरी समजण्याची गरज नाही. कारण २०१४, १५, १६ या तीन वर्षांत आम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे एकमेकांना काय हवे, अपेक्षा कोणत्या आहेत, ते चांगलेच ज्ञात आहे, असे कोहली म्हणाला.

कामात अडचण येणार नाही : कोच शास्त्री  
विराट व मी याआधीही एकत्र काम केले आहे. त्यामुळे थेट कामाला सुरुवात करताना कोणतीही अडचण येणार नाही. मी किंवा कुंबळे प्रशिक्षक म्हणून येऊ आणि जाऊ. मात्र कामगिरी करण्याचे श्रेय खेळाडूंकडे जाते. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक गाठला आहे. मी प्रथम स्वत: खेळाडू म्हणून विचार करतो. प्रत्येक खेळाडूला मी त्याच चष्म्यातून पाहतो. त्यामुळे समोरच्या खेळाडूंना माझ्यासोबत काम करताना त्रास होत नाही, असेही रवी शास्त्री यांनी या वेळी नमूद केले.

शास्त्री यांना हवा सचिन तेंडुलकर..
रवी शास्त्री यांना फलंदाजी प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडऐवजी सचिन तेंडुलकर हवा अाहे. शास्त्री यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या समितीसमोर सचिनच्या नावाची शिफारसही केल्याची माहिती आहे. समितीमधीलच एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. सचिनच्या नियुक्तीने दुहेरी हिताचा मुद्दा उपस्थित होईल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...