आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PRO Kabaddy: Pune Paltan Continuously Third Time Win

प्रो कबड्डी: पुणेरी पलटणचा सलग तिसरा पराभव; विजयासह दिल्ली पाचव्या स्थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणेरी पलटणविरुद्ध सामन्यात गडी मारून नेण्याच्या प्रयत्नात दबंग दिल्लीचा खेळाडू. - Divya Marathi
पुणेरी पलटणविरुद्ध सामन्यात गडी मारून नेण्याच्या प्रयत्नात दबंग दिल्लीचा खेळाडू.
काेलकाता - विजयासाठी धडपडत असलेल्या पुणेरी पलटणच्या वजिराचे डावपेच हाणून पाडत दिल्ली संघाने दबंग विजयाची नाेंद केली. दिल्लीने शुक्रवारी दुसऱ्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये विजयाचे खाते उघडले. दिल्लीने रंगतदार लढतीत पुणेरी पलटणवर ३८-३७ अशा फरकाने मात केली. यासह पुणेरी पलटणचे विजयाचे स्वप्न उधळले गेले. वजीरच्या नेतृत्वाखाली पुणेरी पलटणचा स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला. अाता पुण्याच्या टीमला शनिवारी बंगळुरूच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागणार अाहे.

शेवटच्या मिनिटात सामन्याला कलाटणी देऊन जसमेरसिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने विजयश्री खेचून अाणली. काशिलिंग अडके (१२), राेहितकुमार (११) यांनी केलेल्या सुरेख खेळीच्या बळावर दिल्लीला विजय मिळवता अाला. त्यांनी सुरेख चढाई करून संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले.

या वेळी वजीरने पुणेरी पलटणला विजयी ट्रॅकवर अाणण्यासाठी दिलेली एकाकी झुंज अपयशी ठरली. त्याने सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली. मात्र, त्याला पराभव टाळता अाला नाही.

यू मुंबाची विजयीपंचमी
अनुपकुमारच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेल्या यू मुंबा संघाने शुक्रवारी लीगमध्ये विजयीपंचमी साजरी केली. मुंबाने बंगालचा २९-२४ ने पराभव केला. मुंबा टीमचा लीगमधील हा सलग पाचवा विजय ठरला. यासह मुंबा गुणतालिकेत अव्वलस्थानी अाहे.
दिल्लीसमाेर अाज बंगाल
काेलकात्या मैदानावर विजयाचे खाते उघडणाऱ्या दबंग दिल्लीला शनिवारी यजमान बंगाल वाॅरियर्सच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागले. गत सामन्यातील विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेला दिल्ली संघ लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.