आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एका ताऱ्याचा झाला उदय! पृथ्वीची पदार्पणातच शतकी खेळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तीन वर्षांपूर्वी हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत पृथ्वी शॉ याने ५४६ धावांची बरसात केली होती. त्यावेळेपासूनच नवा सितारा मुंबईच्या क्रिकेट क्षितिजावर उदयाला येत असल्याची चाहूल लागली होती. १९ वर्षांखालील संघातर्फे खेळताना पृथ्वीला राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभले आणि कोवळ्या वयाच्या या युवकामध्ये स्पर्धात्मक क्रिकेटचे आव्हान पेलविण्याची परिपक्वता आली. तो फक्त क्रिकेट रसिकांच्या कौतुकास पात्र ठरला नाही, तर दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले. तेव्हापासून तो मोठ्या व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी शोधत होता. रणजी उपांत्यफेरीच्या तामिळनाडूविरुद्ध सामन्यात त्याला दुसऱ्या डावात ती संधी साधता आली. खेळात काही तासांतच कसा बदल झाला हे रहस्य मुंबईचे काेच व माजी कसोटीपटू चंद्रकांत पंडित यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...