आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन-कांबळीचे विक्रम मोडणा-या पृथ्वी शॉच्या कामगिरीकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- मुंबईचा 17 वर्षीय प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉने गुरुवारी आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफीच्या सामन्यात शतक ठोकत मुंबई संघाला अंतिम फेरीत पोहचवले. पृथ्वी शॉला प्रथमच रणजीत संधी तीही सेमीफायनलसारख्या महत्त्वाच्या लढतीत दिली आणि त्याने 120 धावांची खेळी करत त्या संधीचे सोने केले.
 
मंगळवारपासून इंदूरमधील होळकर स्टेडियमवर रणजीचा अंतिम लढत सुरु झाली आहे. गुजरात आणि मुंबईत यांच्यात ही लढत होत असून, मुंबईकर पृथ्वी शॉच्या कामगिरीकडे लक्ष आहे. याच पृथ्वी शॉने 2013-14 या सालात शालेय क्रिकेटमधील एक विक्रम नोंदवला होता. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांना मागे टाकत पृथ्वी शॉने हा विक्रम नोंदवला होता. मात्र, पृथ्वी शॉचा हा विक्रम दोन वर्षातच मोडीत काढला. गेल्या वर्षी मुंबईच्याच प्रणव धनावडेने नाबाद 1009 धावा काढत शालेय क्रिकेटमधील विक्रम आपल्या नावावर केला.
 
पृथ्वी शॉचा प्रणवने मोडला होता विक्रम...
 
- शालेय क्रिकेटमधील भारतातील पृथ्वी शॉ च्‍या 546 धावांचा विक्रम गेल्या वर्षी प्रणव धनवडेने मोडला होता.
- पृथ्वी शॉने 2013-2014 या दरम्यान हॅरिस शील्ड मॅचमध्ये हा विक्रम केला होता.
- प्रणवने शॉचा विक्रम मोडीत काढत सर्वच प्रकारच्‍या क्रिकेटमध्‍ये भारतातील ही सर्वोत्कृष्‍ट खेळी केली होती.
 
या निमित्ताने पुढे स्लाईडद्वारे नजर टाका, शालेय क्रिकेटमधील आतापर्यंतच्या ऐतिहासिक कामगिरीवर.... 
बातम्या आणखी आहेत...