आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदीच्या बऱ्याच शिव्या खाल्ल्या, पण तो मनाने चांगला- युवराजचा Video Message

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफ्रिदीसह युवराजसिंग. - Divya Marathi
आफ्रिदीसह युवराजसिंग.
नवी दिल्ली- भारताचा स्टार फलंदाज युवराजसिंगने शाहिद आफ्रिदीला एक व्हिडिओ मॅसेज पाठवला आहे. यात त्याने आफ्रिदीच्या पेशावर संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला, "आम्ही शाहिदच्या फार शिव्या खाल्ल्या आहेत, मात्र तो मनाने खूप चांगला आहे." याच बरोबर युवीने चाहत्यांची समजूत काढत असेही म्हटले आहे की, आफ्रिदीचे बोलणे फार मनावर घेऊ नका.
का पाठवला व्हिडिओ मॅसेज?
- पीएसएल पुढल्या वर्षात दुबई येथे सुरू होत आहे.
- युवराजने शाहिद आफ्रिदीला पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- मॅसेजमध्ये युवराज असेही म्हटला की, या लीगमध्ये पेशावर संघ निश्चीतच विजयी होईल कारण या संघात आफ्रिदी आहे.
व्हिडिओ मॅसेजमध्ये कहा म्हणआला युवी?
39 सेकंदांच्या या व्हिडिओ मॅसेजमध्ये युवीने पेशावर संघासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यात तो म्हणाला- ''माझा मॅसेज पेशावर संघासाठी आहे, पीएसएलमध्ये चांगली कामगिरी करा. तुमच्यासाठी देवाला प्रार्थना करू. ज्या संघात शाहिद अफ्रिदी आहे तो संघ चांगलीच कामगिरी करेल. आम्ही शाहिदच्या फार शिव्या खाल्ल्या आहेत. मात्र हे त्याचे वर-वरचे वागणे आहे, तो मनाने फार चांगला आहे. आशा करतो की, आपण सर्वजन मिळून चांगलीच कामगीरी कराल. तुमच्या साठी प्रार्थना करू.
पाकिस्तानचे चाहते करत आहेत युवराजची तारीफ
पीएसएल आणि पेशावर संघाला सपोर्ट केल्याने पाकिस्तानातील क्रिकेट प्रेमी युवीची प्रचंड तारीफ करत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, युवराजने शाहिद आफ्रिदीला पाठवलेला हा खास व्हिडिओ मॅसेज...