आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसरी कसोटी: पुजारा ठरेल कसोटीत सलग आठ दिवस खेळणारा पहिला भारतीय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मुरली विजय (१२८) आणि चेतेश्वर पुजारा (नाबाद १२१) यांच्या शतकी खेळी आणि कर्णधार विराट कोहलीच्या (नाबाद ५४) अर्धशतकाच्या बळावर भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या दिवशी मजबूत स्थितीत पोहोचला. श्रीलंकेने पहिल्या डावात २०५ धावा केल्या. भारताने दुसऱ्या दिवसअखेर  २ बाद ३१२ धावा केल्या. भारताला १०७ धावांची आघाडी मिळाली. संघाच्या अद्याप आठ विकेट शिल्लक आहेत. पुजारा तिसऱ्या दिवशी  मैदानात उतरताच एक वेगळाच विक्रम करेल. तो कसोटी क्रिकेटमध्ये सलग आठ दिवस  फलंदाजी करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनेल. त्याने कोलकात्यामध्ये पहिल्या कसोटीत पाचव्या दिवशी फलंदाजी केली होती. आता तो नागपूरमध्ये पहिले दोन दिवस फलंदाजी करत आहे.   


लॅबची करणार बरोबरी
पुजाराच्या पूर्वी केवळ इंग्लंडचा अॅलन लॅब कसोटी क्रिकेटमध्ये सलग आठ दिवस फलंदाजी करू शकला आहे. त्याने १९८४ मध्ये सलग आठ दिवस फलंदाजी केली. इंग्लंडच्या ज्योफ बायकाॅट आणि अँड्यू फ्लिंटॉपने सलग सात दिवस फलंदाजी केली आहे.   


२०९ धावांची भागीदारी
मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या विकेटसाठी २०९ धावांची भागीदारी रचली. विजयने आपल्या कसोटी करिअरमधील दहावे शतक झळकावले. त्याने २२१ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकार खेचत १२८ धावा कुटल्या. दुसऱ्या बाजूने पुजारा २८४ चेंडूंत १३ चौकारासह नाबाद १२१ धावांवर खेळतोय. विजय बाद झाल्यानंतर पुजारा व विराट कोहलीने नाबाद ९६ धावांची भागीदारी केली. 

 

विजय-पुजाराची सलग चौथ्या कसोटीत शतकी भागीदारी
कसोटीत सलग मुरली विजय आणि पुजाराने सोबत खेळत शतकी भागीदारी केली. अशी कामगिरी करणारी ही जगातील पाचवी जोडी आहे. यापूर्वी लोक्सटन-हार्वी, मांजरेकर-अझहरुद्दीन, बूच-ट्रेस्कोथिक आणि युनूस-युसूफ यांनी अशी कामगिरी केली आहे.   
शतकी भागीदारी केली आहे विजय व पुजारा या जोडीला विदेशात १६ पैकी केवळ एकाच वेळी शतकी भागीदारी करता आली.  

 

२०१७ मध्ये पुजाराच्या एक हजार धावा पूर्ण
चेतेश्वर पुजाराने या चालू वर्षात कसोटीतील आपल्या एक हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारतातील पहिला आणि जगातील तिसरा फलंदाज बनला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गर व श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने यांनी अशी कामगिरी केली. २०१७मध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पुजाराच्या १०४६ धावा झाल्या आहेत. 

 

शतके पुजाराने या वर्षी ठोकली असून तोे भारतीय फलंदाजांमधील सर्वात पुढे आहे. कोहलीची तीन शतके आहेत. जगात डीन एल्गर ५ शतकांसह आघाडीवर आहे.  

शतके झळकावली आहेत पुजाराने १ जानेवारी २०१६ पासून आतापर्यंत. तो विराट कोहलीसोबत बरोबरीत आहे. जागतिक क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथ (८ शतक) अव्वल आहे. 

बातम्या आणखी आहेत...