आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग्ज इलेव्हन पंजाब विजयी ट्रॅकवर; रायझिंग पुणेवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - सलामीवीर मुरली विजय (५३) आणि मनन वोहरा (५१) यांच्या अर्धशतकाच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल-९ मध्ये पहिला विजय साजरा केला. किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी झालेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाला ६ विकेटने हरवले. रायझिंग पुणे संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५२ धावांचा सन्मानजनक स्कोअर उभा केला. मात्र, किंग्ज इलेव्हन पंजाबने १८.४ षटकांत ४ बाद १५३ धावा काढून विजय मिळवला.

दणकट सलामी : किंग्ज इलेव्हन पंजाबकडून सलामीवीर मुरली विजय आणि मनन वोहरा विजयाचे शिल्पकार ठरले. दोघांनी झुंजार कामगिरी करताना १२.२ षटकांत ९७ धावांची मजबूत सलामी देऊन विजयाचा पाया रचला. वोहराने अवघ्या ३३ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांच्या साहाय्याने ५१ धावा ठोकल्या, तर सलामीवीर मुरली विजयने ४९ चेंडूंत २ षटकार, ५ चौकारांसह ५३ धावा झळकावल्या. पंजाबचे शॉन मार्श (४) आणि डेव्हिड मिलर (७) हे दोघे लवकर बाद झाले. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने विजय खेचून आणला. मॅक्सवेलने अवघ्या १४ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ३ चौकारांसह ३२ धावा ठोकल्या.
डुप्लेसिसचे अर्धशतक
पुणे संघाकडून सलामीवीर डुप्लेसिसने सर्वाधिक ६७ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्हन स्मिथने ३८ धावांचे योगदान दिले. इतरांनी निराशा केली. केविन पीटरसन १५, परेरा ८, धोनी १, इरफान २ धावा काढून बाद झाले. डुप्लेसिसने ५३ चेंडूंत ८ चौकारांसह ही खेळी केली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक...