आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलंदाजांची कामगिरी एकमेकांना पूरक असावी- ऑफस्पिनर आर. अश्विनचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय कसोटी संघाचा कप्तान विराट कोहली याच्या पाच गोलंदाजांच्या आक्रमणाच्या योजनेला पाठिंबा दर्शवत आज ऑफस्पिनर आर. अश्विन याने संघाच्या यशासाठी गोलंदाजांचे एकमेकांना पूरक साहाय्य असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. श्रीलंकेच्या ३ कसोटींच्या दौऱ्यावर निघालेल्या भारतीय संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज अश्विन आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना म्हणाला, फिरकी गोलंदाजांचे यश हे वेगवान गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीच्या पायावर उभारले जाते. विशेषत: परदेश दौऱ्यावर वेगवान गोलंदाजांना गोलंदाजीचा अधिक भार उचलावा लागतो. त्या वेळी फिरकी गोलंदाजांचे काम अधिक हलके होत असते.
विजयासाठी सर्वांचे योगदान आवश्यक
- संघातील प्रत्येक खेळाडू जेव्हा आपले योगदान देतो तेव्हा तो संघ यशस्वी होतो. गोलंदाजीचेही तसेच आहे. प्रत्येक गोलंदाजाची कामगिरी एकमेकांसाठी पूरक ठरते तेव्हाच सांघिक कामगिरी चांगली होते.

- गोलंदाजीचा एकत्रित ताळमेळ साधला जाणे महत्त्वाचे आहे. मात्र असा ताळमेळ साधण्यासाठी ५ गोलंदाज सातत्याने, सलग अधिक काळासाठी खेळणे गरजेचे आहे.
- श्रीलंकेतील खेळपट्ट्या भारतातील खेळपट्ट्यांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्या खेळपट्ट्यांबाबत पूर्वग्रह करून जाणे योग्य नाही. श्रीलंकेतील खेळपट्ट्यांवर चेंडूला अधिक उसळी मिळते.
- पाकने श्रीलंकेला मालिकेत सहज हरवले होते. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांच्या कामगिरीपासून आपण स्फूर्ती घ्यायला हवी.
बातम्या आणखी आहेत...