आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा मंत्र्यांच्‍या हस्‍ते अश्विनचा अर्जुन पुरस्काराने गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याला केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्‍या हस्‍ते अर्जुन पुरस्काराने गौरवण्‍यात आले. त्‍याने आतापर्यंत २५ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना १२४ बळी घेतले. एकूण ९९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळून १३९ बळी त्‍याला मिळवता आले. शिवाय २५ टी-२० सामन्यांतून अश्विनने २६ बळी टिपले आहेत. त्‍याच्‍या या कामगिरीचा सत्‍कार सोहळ्यात गौरव करण्‍यात आला.
टीम इंडियाचा प्रमुख फिरकी गोलंदाज म्‍हणून अश्‍विनची ओळख आहे. मागील वर्षी अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर २९ ऑगस्ट २०१४ रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी तो इंग्लंड दौऱ्यावर असल्‍याने अनुपस्थित होता. पुरस्‍कार स्‍विकारल्‍यानंतर अश्‍विन म्‍हणाला, ' देशासाठी खेळण्‍याची मला संधी मिळाल्‍याने मी स्‍वत:ला खुप भाग्‍यवान समजतो. क्रिडा मंत्र्यांच्‍या हस्‍ते अर्जुन पुरस्‍कार मिळणे हा माझा मोठा सन्‍मान आहे. आतापर्यंतचा माझा क्रीडा प्रवास खुप आनंदी राहिला आहे. त्‍यामुळे मी देवाचे आभार मानतो.' अशी प्रतिक्रीयाही त्‍यांने यावेळी दिली. 12 ऑगस्‍टपासून होणा-या श्रीलंका दौ-यासाठी आपण पूर्णपणे सज्‍ज असल्‍याचेही तो म्‍हणाला.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, अश्‍विनचे रेकॉर्ड आणी खास फोटो..