आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • R Ashwin Bowled Just 2 Overs In The Semi Final Against The Windies And Leaked Away 20 Runs

सेमीफायनलमधील \'त्या\' नो बॉलमुळे मी व्हिलन ठरलो नाही- अश्विन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. अश्विन - Divya Marathi
आर. अश्विन
नवी दिल्ली- भारतात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजविरोधच्या सामन्यात आर. अश्विनने टाकलेला तो एक नोब बॉल टीम इंडियाला चांगलाच महागात पडला होता. आर. अश्विनसारखा फिरकी गोलंदाज नो बॉल टाकूच कसा शकतो असा सवाल क्रिकेटतज्ज्ञांसह क्रिकेटरसिकांनी उपस्थित केला होता. कर्णधार धोनीने एकप्रकारे अश्विनच्या त्या नो बॉलवरच अप्रत्यक्ष खापर फोडले होते. त्यामुळे त्या पराभवाचा खरा खलनायक अश्विनचा असल्याची टीका झाली होती. मात्र, अश्विनने यावर आपले मौन सोडले असून, एक नो बॉल टाकल्याने मी व्हिलन ठरू शकत नाही असे म्हटले आहे. अश्विनने इंडिजचा फलंदाज सिमन्स याला टाकलेल्या चेंडूबर बाद केले होते मात्र तो नो बॉल ठरला होता.
अश्विन म्हणाला, भारताच्या पराभावानंतर मी तीन दिवस पेपर वाचला नाही
- एक ‘नो बॉल‘ पडल्यामुळे माझ्यावर अनेकांनी टीका केली.
- भारताच्या पराभवानंतर पुढील तीन दिवस वृत्तपत्रे वाचली नाहीत.
- मी काही जाणून-बुजून ‘नो बॉल‘ टाकला नाही. एका ‘नो बॉल‘मुळे खलनायक बनलो नाही.
- अनेकांनी मला सांगितले की, मी अनेक काळ नो बॉल टाकला नव्हता. त्यामुळे एखाद्या दिवशी असे घडते.
- तो दिवस माझ्यासाठी खराब होता. त्यादिवशी मी केवळ दोनच षटके टाकली होती.
- अनेक लोक वेगवेगळी मते मांडत असतात. प्रत्येकाचे म्हणणे आणि मत ऐकले तर तुम्ही कोणत्याच निर्णयापर्यंत येऊ शकणार नाही.
- एखादा दिवस तुमचा नसतोच. त्यामुळे तो क्षण, घटना विसरून पुढच्या कामाला लागायचे असते.
काय घडले होते त्या सामन्यात?
- भारतीय संघाने 20 षटकात 192 धावा करीत वेस्ट इंडिजला भले मोठे 193 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर गेल व सॅम्युअल्ससारख्या फलंदाजांना पहिल्या तीन षटकांतच बाद करण्यात यश मिळवले होते.
- मात्र, सिमन्स 39 धावांवर असतानाच आर. अश्विनच्या गोलंदाजीवर तो बुमराहकडे झेल देऊन बाद झाला. मात्र, पंचानी तो नो बॉल ठरवला. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाल्यानंतरही तो नो बॉल असल्याचे स्पष्ट झाले होते.
- या दोन नो बॉलवर दोनदा विकेट मिळवूनही सिमन्सला जीवदाने मिळत गेली व त्याने नाबाद 83 धावा करीत भारतावर दणदणीत विजय मिळवला.
धोनी काय म्हणाला होता?
- या पराभवानंतर कर्णधार धोनीने ते दोन नो बॉलमुळे आम्ही पराभवाकडे गेल्याचे सांगितले.
- पंड्या मध्यमगती बॉलर आहे. अशावेळी वेगवान गोलंदाजांकडून नो बॉल पडले जातात. मात्र, फिरकी गोलंदाज तोही अश्विनसारख्या गोलंदाजाने नो बॉल टाकल्याने धोनीने त्याच्यावरच अप्रत्यक्षपणे खापर फोडले होते.
- अश्विनला धोनीच्या वक्तव्याबाबत छेडले असता, कर्णधार त्या वेळी काय म्हणाला ते मला माहित नाही असे म्हणत अधिक बोलण्याचे टाळले.