आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे क्रमवारी : आश्विन टाॅप-१० मध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - बांगलादेशविरुद्ध वनडे मालिकेतील शानदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाचा गाेलंदाज आर. आश्विनने आयसीसीच्या वनडे क्रमवारीत टाॅप-१० मध्ये धडक मारली. त्याने क्रमवारीत तीन स्थानांनी प्रगती साधली. ताे आता ६५४ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. यापूर्वी आश्विन हा १३ व्या स्थानावर हाेता.

दक्षिण आफ्रिकेच्या माेर्केलने नववे स्थान गाठले. यामध्ये आॅस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कने आपले अव्वल स्थान कायम ठेवले.

दुसरीकडे विराट काेहलीला गचाळ फलंदाजीचा फटका बसला. त्याच्या गुणांमध्ये माेठी घसरण झाली. मात्र, त्याने फलंदाजीच्या क्रमवारीतील आपले चाैथे स्थान कायम ठेवले. दुसर्‍या वनडेत ४७ व तिसर्‍या सामन्यात ६९ धावा काढणार्‍या धाेनीने आठव्या स्थानावर धडक मारली.