आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर हाॅकी इंडियाचे पाॅल वानला रेड कार्ड, पाॅलच्या हकालपट्टीची अधिकृत घाेषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय राष्ट्रीय पुरुष हाॅकी टीमचे प्रशिक्षक पाॅल वान एस यांना अखेर रेड कार्ड मिळाले. त्यांची प्रशिक्षक पदावरून गच्छंती करण्यात अाली. हाॅकी इंडियाने शुक्रवारी याची अधिकृत घाेषणा करून पाॅल यांची प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे पाॅल यांना साेडावे लागले.

हाॅकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनीच अापले निलंबन केले हाेते, असा दावा साेमवारी हाॅलंडचे पाॅल यांनी केला हाेता. मात्र, बत्रा यांनी हा अाराेप फेटाळून लावला. तसेच याप्रकरणी स्थापन करण्यात अालेल्या समितीने पाॅल यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला. यासाठी माजी अाॅलिम्पियन अाणि खेळाडूंच्या समितीची बैठक झाली. लीगसाठी भारतीय संघासाेबत बेल्जियमला गेलेल्या पाॅल यांच्या परतीचे तिकीट काढण्यात अाले नव्हते.
पाॅल यांची धमकी
या वेळी पाॅल यांनी अापल्याला जबरदस्तीने या पदावरून काढण्यात अाले अाहे, असा अाराेप केला. तसेच याप्रकरणी अापल्याकडे सबळ असे ठाेस पुरावेदेखील अाहेत. हेच पुरावे अाता अापण जगजाहीर करणार असल्याची धमकीदेखील त्यांनी दिली. त्यामुळे अाता पॉल व हॉकी इंडिया याच्यातील हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता अाहे.