आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rahane To Lead Team To Zimbabwe Dhoni Kohli Shikhar Raina Ashwin Umesh Rested

दिग्गजांना विश्रांती, अजिंक्य राहाणे कर्णधार; जुलैमध्ये झिम्बाब्वे दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - अजिंक्य राहाणे - Divya Marathi
फाइल फोटो - अजिंक्य राहाणे
मुंबई - झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या निवड समितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. टीम इंडियाचे नेतृत्व अजिंक्य राहाणेच्या हाती देत महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा आणि आर. आश्विन यांना विश्रांती देण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे आणि दोन टी-20 सामने खेळणार आहे.
फिरकी गोलंदाज हरभजनसिंगचे संघात संघात पुनरागमन झाले आहे. तर, उमेश यादवला विश्रांती देण्यात आली आहे. अजिंक्य राहाणेकडे कर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे.
निवड समितीने टीम इंडियासोबतच इंडिया-ए संघाचीही निवड केली आहे. निवड समितीच्या बैठकीला अध्यक्ष संदीप पाटील आणि सचिव अनुराग ठाकूर उपस्थित होते.

झिम्बाब्वेला कमी लेखू नये
हॅमिल्टन मसाकादजाच्या नेतृत्वातील झिम्बाब्वे संघाने अलिकडच्या काळात चांगले प्रदर्शन केले आहे. नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी- 20 मध्ये झिम्बाब्वेने चांगली टक्कर दिली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. झिम्बाब्वेचा हा फॉर्म पाहाता टीम इंडिया त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही.
यांना दिली विश्रांती
निवड समितीने महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, शिखर धवन, उमेश यादव, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती दिली आहे.

राहाणेला का मिळाले कर्णधारपद
निवड समितीच्या बैठकीआधी धोनी, विराट आणि अश्विनला विश्रांती दिली जाण्याची चर्चा होती. त्यामुळे सुरेश रैना किंवा रोहित शर्मा यांच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडणार अशी चिन्हे होती. मात्र त्यांना देखील विश्रांती दिल्यानंतर अजिंक्य राहाणेच चांगला पर्याय होता. दुसरे असे, की आयपीएलमध्ये राहाणेने केलेली खेळी त्याला टीम इंडियात स्थानच नाही तर, कर्णधारपद देऊन गेली आहे. या संधीचा त्याला भविष्यात मोठा फायदा होईल.
टीम इंडिया
टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, अंबाती रायुडू, मनोज तिवारी, केदार जाधव, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, हरभजन सिंग, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, कर्ण शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा.

इंडिया-ए टीम : लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, चेतेश्वर पुजारा (कर्णधार), करूण नायर, श्रेयष अय्यर, नमन ओझा, अमित मिश्रा, विजय शंकर, प्रज्ञान ओझा, शार्दुल ठाकुर, वरूण एरॉन, मिथुन मन्हास, उमेश, गोपाल, बाबा अपराजित.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणाकडे कोणती भूमिका
बातम्या आणखी आहेत...