आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसनला घडवण्यात राहुल द्रविडचे योगदान; केरळच्या सॅमसनवर अनेकदा शिस्तभंगाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली आणि पुण्यात झालेल्या सामन्यात केरळचा युवा प्रतिभावंत फलंदाज संजू सॅमसनने तुफानी फलंदाजी करताना शतक ठोकले. त्याच्या या शतकाने सर्वांचे लक्ष वेधले. संजू सॅॅमसनची खेळी बघून भारताला आणखी एक युवा स्टार फलंदाज मिळाला आहे, असे भाकीत अनेक चाहत्यांनी केले. संजू सॅमसनसारख्या खेळाडूला घडवण्याचे काम केले ते शांत आणि संयमी क्रिकेटपटू राहुल द्रविडने. 

क्रिकेटमधून िनवृत्ती घेतल्यानंतर राहुल द्रविड नव्या प्रतिभा शोधून त्यांना घडवण्याचे काम करत आहे. राहुल द्रविडने ज्या खेळाडूंवर भरवसा केला त्यापैकी एक संजू सॅमसन आहे. राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससोबत सामील हाेता, तेव्हा त्याने संजू सॅमसनला सोबत ठेवले होते. राहुल द्रविड दिल्ली संघात आला तर त्याने येथे त्याला सोबत आणले. इतकेच नव्हे, तर संजूच्या सुमार प्रदर्शनानंतरही त्याच्यावर विश्वास टाकत त्याला भारत अ संघात स्थान दिले. 

संजूने सुद्धा मंगळवारी १०२ धावांची शतकी खेळी करून द्रविडचा विश्वास सार्थ ठरवला. या खेळीत संजू सॅमसनचे तंत्र, शैली आणि मानसिक मजबुती दिसून आली. संजूने अवघ्या ६३ चेंडूंत ८ चौकार, ५ षटकारांच्या साह्याने शतक ठोकले.    संजू सॅमसनवर अनेकदा शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. त्याच्यावर अनेकदा गैरवर्तनाचे आरोपही झाले. द्रविडने त्याच्या ऊर्जेला सकारात्मक दिशेला मोडण्याचे काम केले. द्रविडने त्याला मानसिक मजबुती दिली.   
बातम्या आणखी आहेत...