आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रविडच्या 10 वर्षांच्या मुलाने ठोकले शानदार शतक, विरोधीसंघावर पडला भारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोयोला ग्राऊंडवर खेळतानी समितने फ्रँक अँथोनी पब्लिक स्कूल विरोधात 125 रन्सची खेळी केली. - Divya Marathi
लोयोला ग्राऊंडवर खेळतानी समितने फ्रँक अँथोनी पब्लिक स्कूल विरोधात 125 रन्सची खेळी केली.
बंगळुरु - वडील राहुल द्रविडच्याच पावलावर पाऊल टाकत अाता दहावर्षीय समित क्रिकेटच्या विश्वात अापली अाेळख निर्माण करण्यासाठी मार्गस्थ झाला. त्याने क्लब क्रिकेट स्पर्धेत शानदार शतक ठाेकले. त्याने १४ वर्षांखालील टायगर चषक क्रिकेट स्पर्धेत हे यश संपादन केले. समितने स्पर्धेत बंगळुरू युनायटेड क्लबचे प्रतिनिधित्व करताना १२ चाैकारांच्या अाधारे १२५ धावांची झंझावाती खेळी केली. या शतकाच्या बळावर त्याने अापल्या टीमच्या फ्रेंक अॅँथाेनी पब्लिक स्कूलवरील विजयात माेलाचे याेगदान दिले. बंगळुरू युनायटेड क्लबने २४६ धावांनी विजय मिळवला.

राहुल द्रविडचा मुलगा समितने शानदार फटकेबाजी केली. त्याने अापला सहकारी प्रत्युषसाेबत माेठी भागीदारी केली. या ३० षटकांच्या सामन्यात प्रत्युषने सर्वाधिक १४३ धावा काढल्या. त्याने ज्युनियर द्रविडसाेबत चाैथ्या विकेटसाठी २१३ धावांची भागीदारी केली. या वेळी ३२६ धावांच्या खडतर अाव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पब्लिक स्कूलचा ८० धावांत खुर्दा उडाला. त्यामुळे युनायटेडला माेठ्या फरकाने विजय मिळवता अाला. यापूर्वी त्याने गत सप्टेंबरमध्ये १२ वर्षांखालील गाेपालन क्रिकेट चॅलेंज स्पर्धेत सर्वाेत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान पटकावला हाेता.
समितने लगावले 12 चौकार
- समितने 12 चौकार लगावले. संघासाठी मोठी धावसंख्या उभारणारा तो दुसरा खेळाडू ठरला. त्याच्यापेक्षा जास्त रन्स प्रत्युषने (143) केले.
- दोघांनी चौथ्या विकेटसाठी 213 रन्सची पार्टनरशिप केली.
- 30 ओव्हरच्या मॅचमध्ये बीयूसीसीने 326 रन्स केले. तर, फ्रँक अँथोनी पब्लिक स्कूलच्या संघाची हा धावांचा डोंगर सर करतानी दमछाक झाली. अवघ्या 80 रन्सवर ते सर्वबाद झाले.
- 10 वर्षांचा समित त्याच्या खेळाने प्रथमच चर्चेत आलेला नाही. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये अंडर-12 संघात गोपालन क्रिकेट स्पर्धेत त्याने बेस्ट बॅट्समनचे पारितोषिक पटकावले होते.
- त्याने या स्पर्धेत तीन अर्ध शतक ( 77*, 93, आणि 77) ठोकले होते. समित त्याच्या माल्या अदिती इंटरनॅशनल शाळेकडून खेळत होता.