आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार होण्याआधी असा होता राहुल द्रविड, पाहा त्याचे RARE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल द्रविड. - Divya Marathi
राहुल द्रविड.
स्पोर्ट्स डेस्क- राहुल द्रविडने मंगळवारी आपल्या 44 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. राहुलचा जन्म 11 जानेवारी, 1973 रोजी इंदूर येथे झाला. फार थोड्या लोकांना कल्पना असेल की तो, क्रिकेट खेळण्याआधी हॉकी खेळायचा. द्रविडने शालेय स्तरावर अनेक किताब जिंकले आहेत. तो त्याच्या वडिलांकडून क्रिकेट शिकला. त्याने 1996 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी करिअरला सुरुवात केली.
 
राहुल द्रविडच्या क्रिकेट करिअर संबंधी काही रोमांचक फॅक्ट्स...
 
- त्याने 164 कसोटी सामने खेळताना 13288 धावा केल्या आहेत. यात 36 शतकांचा आणि 63 अर्ध शतकांचा समावेश आहे. 
- 344 एक दिवसीय सामन्यांमध्ये त्याने 12 शतके आणि 83 अर्ध शतके करत 10889 धावा केल्या आहेत.
- सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकरनंतर कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजारहून अधिक धावा करणारा तो तीसरा भारतीय खेळाडू आहे. 
- कसोटी समने खेळणाऱ्या सर्वच्या सर्व 10 देशांच्या विरुद्ध शतक झळकवणारा तो पहीलाच फलंदाज आहे.
- द्रविडने 18 वेगवेगळ्या खेळाडूंसोबत 75 वेळा शतकी भागिदारी केली आहे. हा एक जागतिक विक्रम आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, राहुल द्रविडचे बालपणापासून ते स्टार क्रिकेटर होईपर्यंतचे काही खास निवडक फोटोज...