आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या यशस्वी कामगिरीचा अनादर करणे अयोग्य : रैना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व त्याच्या यशाचा अनादर करू नका. अद्याप त्याच्यात बरेच क्रिकेट शिल्लक असल्याची भावना टीम इंडियाच्या मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने कर्णधाराची जोरदार पाठराखण करताना व्यक्त केली.

मालिकेतील तिसर्‍या व अंतिम लढतीत सामनावीर पुरस्कार पटकावणार्‍या रैनाने धोनीचा बचाव केला. बांगलादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमावल्यामुळे कर्णधारावर टीका होत आहे.

भारताचे २० पैकी १४ विजय
भारताने २०१४-१५ च्या वनडे मालिकेत २० पैकी १४ सामने धोनीच्या नेतृत्वात जिंकले आहेत. त्यामुळे िवजयांच्या बाबतीत आॅस्ट्रेिलया व न्यूझीलंडनंतर भारताचा ितसरा क्रमांक लागतो.
बातम्या आणखी आहेत...