आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तरच टीम पाकमध्ये खेळू शकेल : राजीव शुक्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीदिल्ली- लाहोरमध्ये पाकिस्तान जर सुरक्षित वातावरण तयार करीत असेल तर टीम इंडियाला तेथे खेळण्यास काहीच अडचण नाही, असे मत आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी व्यक्त केले. पाकच्या एका न्यूज चॅनलशी बोलताना शुक्ला यांनी ही माहिती दिली. शुक्ला म्हणाले, "स्टेडियमच्या जवळ सुरक्षेच्या दृष्टीने एखाद्या हॉटेलची निर्मिती करावी. असे झाल्यास भारतासह इतर देशही पाकमध्ये क्रिकेट खेळू शकतील.' भारत आणि पाकिस्तानदरम्यान डिसेंबरमध्ये नियोजित दौऱ्याबाबत शुक्ला म्हणाले, दोन्ही देशांत क्रिकेटबाबत करार झाला होता. करार झाला तेव्हा आयसीसी आणि बीसीसीआयचे नेतृत्व इतरांच्या हाती होते, असेही त्यांनी नमूद केले. दुबईत आयसीसीचे प्रमुख शशांक मनोहर आणि इंग्लंड मंडळाचे अध्यक्ष जाइल्स क्लार्क यांच्यासोबत पीसीबीचे नजम सेठी बैठक करणार आहेत.