आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामगोपाल वर्मांची टिवटिव; म्हणाले- एक सिल्वर जिंकले तर इतका जल्लोष कशाला?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामगोपाल वर्मा.. - Divya Marathi
रामगोपाल वर्मा..
मुंबई- फिल्म डायरेक्टर राम गोपाल वर्माला भारताने रिओ ऑलिंपिकमध्ये सिल्वर जिंकल्याचे फार समाधान झाल्याचे दिसत नाही. वर्माने म्हटले की, "भारताने एक सिल्वर मेडल जिंकले तर आपल्या देशाला अतुल्य भारत जाहीर केले जाते. जर आम्ही अमेरिकेसारखी 46 गोल्ड, 37 सिल्वर आणि 49 ब्राँझ जिंकली काय होईल?" 120 कोटीचा देश केवळ एक सिल्वर आणतो....
- राम गोपाल वर्माने ट्वीट केले की, "अमेरिकेच्या 46 गोल्ड, 37 सिल्वर आणि 49 ब्राँझ जिंकल्याची तुलना एक सिल्वरसोबत केली जात आहे. असे काही सांगितले जात आहे की, आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे आहोत. त्यांच्या यूएस महानची तुलना आपला भारत महानसोबत केली जात आहे."
- वर्माने पुढे लिहले की, "अमेरिकेच्या 32 कोटी लोकसंख्येतून 46 गोल्ड येतात. 5 कोटी लोकसंख्येचा दक्षिण कोरिया 9 गोल्ड जिंकतो तर 120 कोटींचा माझा भारत देश केवळ एक सिल्वर मेडल जिंकतो."
- "जर एक सिल्वरवर आम्ही खूप उतावळे व खूष होत असू व मेरा भारत महान असा सूर लावत असू तर 46 गोल्ड आणि 37 सिल्वर जिंकलेल्या अमेरिकन यांनी काय केले पाहिजे?"
पुढे स्लाईडद्वारे पाहा, रामगोपाल वर्मांनी नेमके काय केले आहे टि्वट..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...