आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगाल पहिल्या डावात दिवसअखेर ३ बाद २३९, महाराष्ट्रविरुद्ध बंगालची दमदार सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्रविरुद्ध बंगालने पहिल्या दिवशी ३ बाद २३९ धावा करत महाराष्ट्राला दबावात आणले. करा किवा मरा अशा अवस्थेत असलेल्या महाराष्ट्राला आता तिन्ही सामने जिंकणे आवश्यक अाहे.

नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने बंगालला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, महाराष्ट्राच्या गोलंदाजांना झटपट विकेट काढता आल्या नाहीत. बंगालच्या तीन फलंदाजांनी शानदार अर्धशतके झळकावली. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनने १५४ चेंडूचा सामना करताना ६ चौकार खेचत ६५ धावा काढल्या. समद फल्लाहने राहुल त्रिपाठीकरवी त्याला झेलबाद करत सलामीवीर जोडी फोडली. दुसरा सलामीवीर सयन शेखर मंडळने १५३ चेंडंूत ८ चौकार लगावत ५८ धावा जोडल्या. अभिमन्यू व सयन या जोडीने शतकी सलामी दिली. त्यांनी २९४ चेंडंूत १२८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या सुदीप चटर्जी ११६ चेंडूंत ८ चौकार खेचत नाबाद ५१ धावांवर खेळत आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या अनुभवी मनोज तिवारी ७० चेंडूंत ३० धावा करत तंबूत परतला. त्याला डी. मुथ्थास्वामीने कर्णधार रोहित मोटवाणीच्या हाती झेल देऊन बाद केले. एस. गोस्वामी नाबाद २१ धावांसह मैदानावर टिकून आहे. महाराष्ट्राकडून समद फल्लाह, श्रीकांत मंुढे आणि डी. मुथ्थास्वामी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

तिघांची अर्धशतके
बंगाल संघाकडून सलामीवीर अभिमन्यू इश्वरन (६५), सायन माेडाल (५८) अाणि सुदीप चटर्जी (नाबाद ५१) यांनी शानदार अर्धशतक ठाेकले. त्यामुळे बंगालला दिवसअखेर माेठी धावसंख्या उभी करता अाली. चटर्जी हा नाबाद ५१ धावांवर सध्या खेळत अाहे.