आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Ranji Trophy: Aaron, Ashish Help Jharkhand Bundle Out Maharashtra For 210

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणजी : महाराष्ट्रविरुद्ध कुशलसिंगच्या शतकाने झारखंडची आघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - रणजी लढतीत दुसऱ्या दिवशी मधल्या फळीतील फलंदाज कुशलसिंगच्या (१२१) नाबाद शतकाच्या बळावर झारखंडने महारष्ट्राविरुद्ध ८३ धावांची आघाडी घेतली. दिवसअखेर झारखंडने ९९ षटकांत ७ बाद २९३ धावा काढल्या. त्यांचे अद्याप तीन गडी शिल्लक आहेत. महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद २१० धावा केल्या आहेत.

कालच्या २ बाद ३३ धावांच्या पुढे खेळताना झारखंड संघाचा सौरभ तिवारी ३३ धावा करून बाद झाला, तर विराट सिंग ४४ धावांवर असताना अनुपम संकलेचाने स्वप्निल गुगळेकरवी त्याला झेलबाद केले. विराटने १५७ चेंडूंत ७ चौकार लगावले, तर सौरभने ३५ चेंडूंत ६ चौकार मारले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या इशांक जग्गीला भोपळासुद्धा फोडता आला नाही. श्रीकांत मुंढेने त्याला राखीव खेळाडू मुर्तुझा ट्रंकवालाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. आनंद सिंगने सामन्यात २४ धावा केल्या.

सातव्या क्रमांकावर आलेल्या कुशलसिंगने महाराष्ट्राच्या गोलंदाजांची धुलाई करत नाबाद शतक झळकावले. तो १७८ चेंडूंचा सामना करताना १५ चौकार आणि ३ षटकार खेचत नाबाद १२१ धावांवर खेळत आहे. कुशलने एस. नदीमसोबत सातव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. यासह त्यांनी टीमच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. दरम्यान, नदीमने २५ धावा केल्या, तर वरुण अॅरोन २४ धावांवर नाबाद आहे.

श्रीकांत, संकलेचा चमकले
महाराष्ट्र संघाकडून दुसऱ्या दिवशी श्रीकांत मुंढे अाणि अनुप संकलेचा हे दाेघे चमकले. त्यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. श्रीकांतने २५ षटकांत १०० धावा देताना हे यश संपादन केले. तसेच संकलेचाने २९ षटकांत ६० धावा देऊन तीन गडी बाद केले. सत्यजित बच्छावला एक गडी बाद करता अाला.
बातम्या आणखी आहेत...