आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी : अंकित बावणेचे अर्धशतक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रणजी चालू हंगामातील पहिल्या लढतीत भरवशाचा फलंदाज अंकित बावणेच्या अर्धशतकाच्या बळावर महाराष्ट्राने ७१.१ षटकांत सर्वबाद २१० धावा काढल्या. दिवस अखेर झारखंडची १५ षटकांत २ बाद ३३ धावा अशी खराब सुरुवात झाली. अंकित बावणेने ७८ धावा काढून स्पर्धेत दमदार सुरुवात केली.

नाणेफेक जिंकून झारखंडने महाराष्ट्राला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. सलामीवीर स्वप्निल गुगळे ११ तर हर्षद खडीवाले ५ धावा करून बाद झाले. त्यापाठोपाठ आर. गायकवाडदेखील १५ धावांवर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार केदार जाधव आणि अंकित बावणे या जोडीने संघाचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या गड्यासाठी १०२ धावांची भागीदारी केली. केदारने ९९ चेंडूंत एका चौकारासह ५९ धावा केल्या. अंकितने संयमी खेळी करत १६० चेंडूंचा सामना करताना ९ चौकार आणि २ षटकार खेचत ७८ धावा काढल्या. विशांत मोरेच्या नाबाद ११ धावा वगळता इतर फलंदाज आल्यापावली तंबूत परतले. झारखंडकडून वरुण अॅरोनने १५ षटकांत ४७ धावा देत ४ विकेट घेतल्या. आशिष कुमारने ३ तर ए. यादवने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात दिवसअखेर झारखंडने २ बाद ३३ धावा काढल्या.
बातम्या आणखी आहेत...