आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी ट्रॉफी : दिल्लीच्या ऋषभ पंतची दीडशतकी खेळी; दिल्लीच्या ५ बाद ३७६ धावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेर दिल्लीने ५ बाद ३७६ धावा काढल्या. दिल्ली पहिल्या डावात अजूनही २५९ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्या ५ विकेट शिल्लक आहेत. पहिल्या डावात महाराष्ट्राने त्रिशतकवीर कर्णधार स्वप्निल गुगळे व द्विशतक ठोकणाऱ्या अंकित बावणेच्या विक्रमी भागीदारीच्या बळावर ६३५ धावांचा डोंगर उभारला.
कालच्या बिनबाद २१ धावांच्या पुढे खेळताना सलामीवीर उन्मुक्त चंदला २४ धावांवर असताना रणजीत पदार्पण करणाऱ्या सय्यद मोहसीनने चिराग खुराणाकरवी झेलबाद केले. दुसरा सलामीवीर मोहित शर्मा १८ धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शौर्यने अर्धशतक ठोकले. त्याने १५८ चेंडूंचा सामना करताना ७ चौकारांसह ७१ धावा काढल्या. मधल्या फळीतील एन. राणाने ७३ चेंडूंत ४४ धावा जोडल्या. शौर्य व राणा जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचली. ऋषभ पंतने नाबाद दीडशतकी खेळी केली. त्याने १६५ चेंडूंत २१ चौकार व ६ षटकार खेचत नाबाद १५५ धावा ठोकल्या. पंत व मिलिंद जोडीने पाचव्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. मिलिंदने ९१ चेंडूंत ४५ धावा केल्या.
पदार्पणात मोहसीन चमकला : रणजी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या उस्मानाबादच्या सय्यद मोहसीनने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने १६.२ षटकांत ७३ धावा देत ३ विकेट घेतल्या. मोहसीनने कर्णधार उन्मुक्त चंद, डी. शाैर्य आणि मिलिंदकुमार या तिघांना बाद केले.
धावफलक
दिल्ली पहिला डाव धावा चेंडू ४ ६
उन्मुक्त झे. खुराणा गो. मोहसीन २४ ५० ०४ ०
मोहित पायचीत गो. मुंढे १८ ३१ ०२ ०
शौर्य झे. मोरे गो. मोहसीन ७१ १५८ ०७ ०
राणा झे. व गो. खुराणा ४४ ७३ ०७ ०
ऋषभ पंत नाबाद १५५ १६५ २१ ६
मिलिंद झे. मोर गो. मोहसीन ४५ ९१ ०७ ०
अवांतर : १९. एकूण : ९४.२ षटकांत ५ बाद ३७६ धावा. गोलंदाजी : अनुपम संकलेचा १४-३-३८-०, मोहसीन सय्यद १६.२-३-७३-३, श्रीकांत मुंढे १३-१-५९-१, सत्यजित बच्छाव २६-७-९८-०, चिराग खुराणा २३-१-८५-१, स्वप्निल गुगळे २-०-९-०.
बातम्या आणखी आहेत...