आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Ranji Trophy: Maharashtra Registered A Comprehensive Innings And 52 Runs Win

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्राचा आसामवर १ डाव, ५२ धावांनी विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - रणजी लढतीत केदार जाधव आणि चिराग खुराणाच्या शतकानंतर अनुपम संकलेचाच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने आसामवर एक डाव आणि ५२ धावांनी शानदार विजय मिळवला. महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद ५४२ धावांचा डोंगर उभारला होता. आसामने पहिल्या डावात २५६ धावा केल्या. अासामचा दुसरा डाव २३४ धावांवर संपुष्टात आला. या विजयामुळे महाराष्ट्राला ७ गुण देण्यात आले आणि संघाचा चालू रणजी हंगामातील हा दुसरा विजय ठरला.
कालच्या ६ बाद ११५ धावांच्या पुढे खेळताना ४ फलंदाजांनी ११९ धावांची भर घातली. कर्णधार अरुण कार्तिक आणि पुरकायास्थ या कालच्या नाबाद जोडीने अर्धशतके झळकावत संघाला पराभवातून वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. अरुण कार्तिकने १७७ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांसह नाबाद ८७ धावा केल्या. पुरकायास्थने ६९ धावांची खेळी केली. त्याने या खेळीत ५७ चेंडूंत १३ चौकार खेचले. त्याला सत्यजित बच्छावने मोहसीन सय्यद करवी झेल बाद केले. अरुण आणि पुरकायास्थ या जोडीने सातव्या विकेटसाठी १०२ चेंडूंत ९१ धावांची भागीदारी रचली. तळातील फलंदाज अबू अहमद भोपळाही फोडू शकला नाही. ए.के. दास अवघ्या एका धावेवर तंबूत परतला. रणजीत पदार्पण करणारा दत्तू शून्यावर बाद झाला.
अनुपम संकलेचा चमकला
चालू सत्रात जबरदस्त फार्मात असलेल्या अनुपम संकलेचाने आसामविरुद्ध दोन्ही डावांत मिळून १२ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत संघाच्या विजयात मोलाचे योगदान िदले. त्याने दोन्ही डावांत एकूण ४० षटकांत १४४ धावा दिल्या आणि ९ षटके निर्धाव टाकली. गेल्या सामन्यात विदर्भाविरुद्ध त्याने १४ बळी घेऊन आपली भेदकता दाखवून दिली होती.
महाराष्ट्र तिसऱ्यास्थानी
रणजी लढतीच्या ९ संघांच्या ब गटात सध्या महाराष्ट्राचा संघ २१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. महाराष्ट्र टीमने ६ सामन्यांत २ विजय आणि १ पराभवाचा सामना केला. तीन लढती अनिर्णायक राहिल्या. गटात कर्नाटक ३० गुणांसह अव्वल तर झारखंड २६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. सौराष्ट्र ६ गुणांसह तळाला आहे. कोलकाता येथे झालेल्या मागच्या सामन्यातही महाराष्ट्राने विदर्भाला डावाने हरवत ७ गुणांची कमाई केली होती.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र सर्वबाद ५४२. आसाम पहिला डाव २५६. आसाम दुसरा डाव सर्वबाद २३४ धावा. अरुण कार्तिक नाबाद ८७, पुरकायस्थ ६९ धावा. अनुपम संकलेचा ४/७१, मोहसीन सय्यद ४/४७.
बातम्या आणखी आहेत...