आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजपासून रणजी सत्राला सुरुवात, २८ संघ खेळणार : ७०० पेक्षा अधिक खेळाडू अॅक्शनमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनेक बदलांनंतर गुरुवारपासून देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा रणजी ट्रॉफीला सुरुवात होत आहे. ६ ऑक्टोबर ते ७ जानेवारीपर्यंत चालणारी ही स्पर्धा अनेक अर्थांनी वेगळी ठरेल. या वेळी सर्व संघांचे सामने तटस्थ ठिकाणी होतील. सामने स्पर्धात्मक होण्यासाठी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील तांत्रिक समितीने रणजी सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याची शिफारस केली होती. या स्पर्धेत २८ संघ सहभागी होत असून यात जवळपास ७०० खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील.

तटस्थ स्थानी खेळल्यानंतर सामन्याचे निकाल आणि स्पर्धेच्या लोकप्रियतेवर काय परिणाम होतो, हे बघावे लागेल. सर्वच संघांपुढे परिस्थितीनुसार स्वत:ला अॅडजस्ट करण्याचे आव्हान असेल.
बातम्या आणखी आहेत...