आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तन्वी बाहेर; जयराम सेमीफायनलमध्ये रशियन अाेपन बॅडमिंटन : चीनच्या चाेंगवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्लादिवाेस्तक- भारताचा युवा खेळाडू अजय जयरामने विजयी माेहीम अबाधित ठेवत रशियन अाेपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. याशिवाय भारताच्या प्राजक्ता सावंत अाणि अक्षय देवालकरने विजयासह मिश्र दुहेरीच्या अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला.

तिसऱ्या मानांकित जयरामने मलेशियाच्या फेंग चाेंगवर २१-१५, २१-१३ ने मात केली. यासह त्याने ३० मिनिटांमध्ये उपांत्य फेरी गाठली. अाता त्याचा सामना अव्वल मानांकित टाेमी सुगियार्ताेशी हाेईल.

तन्वीची झुंज अपयशी : भारताची युवा खेळाडू तन्वी लाडने महिला एकेरीच्या अंतिम अाठमध्ये दिलेली झंुज अपयशी ठरली. तिने विजयासाठी १ तास ०३ मिनिटे प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र, तिला पराभवाला सामाेरे जावे लागले. रशियाच्या काेसेत्सकायाने घरच्या मैदानावर तन्वीला २६-२८, २१-१३, २१-१९ ने पराभूत केले. त्यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
अक्षय-प्राजक्ता विजयी
भारताच्या अक्षय देवालकर अाणि प्राजक्ता सावंतने मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात चाैथ्या मानांकित राेनान -एमिलेचा पराभव केला. भारताच्या जाेडीने २१-१८, २१-१४ ने विजय संपादन केला. या जाेडीने सरस खेळी करून उपांत्यपूर्व लढतीत ३३ मिनिटांमध्ये विजयश्री खेचून अाणली.