कानपूर- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. टीम इंडियाचा अष्टपैलू रविंद्र जडेजाने 58 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 50 धावा केल्या. जडेजाने पहिल्या डावात 5 गडी टिपले होते. त्यानंतर नाबाद असे आकर्षक अर्धशतक ठोकताच त्याने हवेत बॅट फिरवून आनंद व्यक्त केला. जडेजा बडोद्याचा असून तो राजपूत कम्यूनिटीमधून येतो.
आपल्याला माहित असेलच की, बडोद्यातील राजपूत कम्यूनिटीचा इतिहास एक वॉरियर म्हणून राहिला आहे. तलवारबाजी करणे व ती लिलया चालवणे हे कम्यूनिटीचे वैशिष्ट्य मानले जाते. रविंद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी करीत आपला लौकिक सिद्ध केला. आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे आनंदित झालेल्या जडेजाने नाबाद अर्धशतक ठोकताच हवेत जोरदार बॅट फिरवली. त्याच्या यशाचा जल्लोष सुरु असताना तिकडे टीम इंडिया त्याचे स्वागत करीत होती. मात्र, जडेजाचे अर्धशतक होताच कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. तरीही जडेजाचे हवेत बॅट फिरवणे सुरुच होते. अखेर विराटने त्याला हसत हसत हवेत बॅट फिरविण्याचे थांबव आणि मैदानातून बाहेर या असे सांगितले. आता या घटनेचा व्हिडिओ वायरल होत आहे.
लग्नातही हवेत फिरवली होती तलवार-
- रविंद्र जडेजा राजपूत कम्यिनूटीमधून येतो. राजपूत कम्यिनूटीत लग्नात हवेत तलवारबाजी केली जाते.
- यासाठी वधू पक्षाकडून वर पक्षाला तलवार भेट दिली जाते.
- जडेजाचे एप्रिल महिन्यात लग्न झाले. त्याने रीवाबा नावाच्या तरूणीसमवेत विवाह केला.
- रीवाबाच्या कुटुंबियांनी जडेजाला लग्नात तलवार भेट दिली होती.
- त्यावेळी जडेजाने घोड्यावर बसून हवेत तलवारबाजी केली होती.
- अनेक पाहुण्यासमोर हा समारंभ चालला होता.
- त्याच्या लग्नातील तलवारबाजीचा व्हिडिओही तेव्हा खूपच वायरल झाला होता.
पुढे स्लाईडद्वारे व्हिडिओतून पाहा, जडेजाचा वायरल होत ताजा VIDEO...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)