आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

... तर या कारणामुळे युवराजसिंगच्या लग्नाला जाणार नाही वडील योगराजसिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 30 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचा क्रिकेटर युवराजसिंग गर्लफ्रेंड हेजल किचसोबत लग्न करणार आहे. क्रिकेट, बॉलिवूड, राजकारण आदी क्षेत्रातील दिग्गज या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. पण युवराजसिंगचे वडील योगराजसिंग मात्र याला उपस्थित राहणार नाहीत. योगराज यांचे नाव युवराजसिंगच्या लग्नाच्या कार्डवरही आहे. तरीही योगराज यांनी म्हटले आहे, की मी लग्नाला जाणार नाही.
याचे कारण योगराज यांनी युवराजच्या आईला सांगितले
- योगराज म्हणाले, की मी या खास क्षणाला मिस करेल. पण माझ्याकडे पर्याय नाही.
- मी कोणत्याही धार्मिक गुरुवर विश्वास ठेवत नाही. ही माझी तत्त्वे आहेत. माझे विचार आहेत.
- मी केवळ आणि केवळ देवावर विश्वास ठेवतो. देव आणि माझ्यात कोणीही नाही.
- युवराजचे लग्न चंदिगडच्या फतेहगड साहेब गुरुद्वारात होणार आहे. त्यासाठी गुरुद्वाराची परवानगी घेण्यात आली आहे.
- ललित हॉटेलमध्ये होणाऱ्या संगीत आणि मेंदी कार्यक्रमाला मात्र योगराज जाणार आहेत. या कार्यक्रमांवर माझा आक्षेप नाही, असे योगराज सांगतात.
पुढील स्लाईडवर बघा, युवराजसिंगचे फॅमिली फोटो....
बातम्या आणखी आहेत...