श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात
टीम इंडियाचा पाच विकेटने दारुण पराभव झाला. भारतीय खेळाडूंचा परफॉर्मन्स बघून विश्वास बसत नव्हता, की हा तोच संघ आहे ज्याने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या होम ग्राऊंडवर 3-0 ने जोरदार पराभव केला होता.
बॅटिंगमध्ये अतिआत्मविश्वास नडला, कमी अनुभव असलेल्या श्रीलंका टीमला फारच कमी लेखले... वाचा काय आहेत पराभवाची कारणे
- ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या विजयामागे टॉप ऑर्डरची चमकदार कामगिरी कारणीभुत होती. पण कालच्या सामन्यात हे बघायला मिळाले नाही.
- ओपनर्स रोहित शर्मा आणि शिखर धवन चांगले खेळले नाहीत. इनिंगच्या दुसऱ्या बॉलवरच एक कॅज्युअल शॉट खेळून रोहित शुन्यावर बाद झाला. धवनने केवळ 9 धावा केल्या.
- विराटच्या जागी खेळत असलेला अजिंक्य राहाणे केवळ 4 धावा करु शकला. एका बॉलवर तर पार त्याची धांदड उडाली. त्यातच तो बाद झाला. त्याचे टायमिंग चुकले. त्याने बॉल येण्यापूर्वीच बॅट वळवली.
- रैना (20), युवराज (10) आणि धोनी (2) यांनी सारखीच चुक केली.
सामन्यात काय झाले
- टीम इंडियाने आधी बॅटिंग केली. संपूर्ण 20 ओव्हरही त्यांना खेळता आले नाही. 18.5 ओव्हरमध्ये 101 धावा करुन टीम ऑल आऊट झाली.
- अश्विनने 31 आणि रैनाने 20 धावा केल्या.
- 102 धावांचे टार्गेट श्रीलंकाने 18 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केले.
- चांडीमलने 35 तर कपुगेदरा याने 25 धावा केल्या.
- नेहरा आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पण ते श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत.
काय होती पराभवाची इतर कारणे
- श्रीलंकेच्या नवीन खेळाडूंना कमकुवत समजणे महाग पडले.
- कॅच सोडून संधी गमावल्या.
- पिचमधील ओलावा समजला नाही.
- टॉसने अदा केला महत्त्वपूर्ण रोल.
रॅंकिंग वाचविण्यासाठी भारताला हे करावे लागेल
- टॉप रॅंकिंग टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला पुढील दोनही सामने जिंकावे लागतील.
- एका सामन्यातही पराभव झाला तर भारत सातव्या क्रमांकावर जाण्याचा धोका आहे.
- टीम इंडिया 0-3 ने सिरिज हरली तर श्रीलंका रॅंकिंगमध्ये टॉपवर जाईल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, काय राहिली टीम इंडियाच्या पराभवामागची इतर कारणे....