आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाॅर्ड्सवर विक्रमी १६१० धावांचा पाऊस!, पहिल्या कसोटीत इंग्लंडचा १२४ धावांनी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - यजमान इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसाेटीदरम्यान लाॅर्ड््सवर विक्रमी १६१० धावांचा पाऊस पडला. या मैदानावरचा हा एका सामन्यात सर्वाधिक धावा काढण्याचा नवा विक्रम ठरला अाहे. त्यामुळे या कसाेटीला क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लाॅर्ड््सवर एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले अाहे. तसेच या कसाेटीने भारत व इंग्लंड कसाेटीतील विक्रमी १६०३ धावांचा विक्रमही माेडीत काढला. पहिली कसाेटी इंग्लंडने जिंकली. इंग्लंडने न्यूझीलंडवर १२४ धावांनी मात करून मालिकेत १-० ने अाघाडी मिळवली.

गत १८८४ पासून अातापर्यंत लाॅर्ड्सवर एकूण १३० कसाेटी झाल्या अाहेत. या मैदानावर तिसऱ्यांदा १६०० पेक्षा अधिक धावा निघाल्या.

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसाेटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने ३८९ धावा काढल्या हाेत्या. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५२३ धावांची खेळी करून अाघाडी मिळवली हाेती. इंग्लंडने दुसऱ्या डावात ४७८ धावा काढून पाहुण्या टीमसमाेर ३४५ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दुसऱ्या डावात २२० धावा काढल्या.. यासह नव्याने १६१० धावांचा विक्रम नाेंदवला गेला. यात नऊ अर्धशतके अाणि ३ शतकांचा समावेश अाहे.

भारत-इंग्लंड विक्रम ब्रेक
भारत अाणि यजमान इंग्लंड यांच्यात १९९० मध्ये लाॅर्ड््सवर कसाेटी झाली हाेती. या कसाेटीत सर्वाधिक १६०३ धावांचा विक्रम नाेंदवला गेला हाेता. मात्र, अाता तब्बल २५ वर्षांनंतर हा विक्रम माेडीत निघाला अाहे.
विक्रमी धावसंख्या
धावा संघ वर्ष
१६०१ अाॅस्ट्रेलिया-इंग्लंड १९३०
१६०३ भारत-इंग्लंड १९९०
१६१० न्यूझीलंड-इंग्लंड २०१५

इंग्लंड : पहिला डाव : ३८९, दुसरा डाव ४७८
न्यूझीलंड : पहिला डाव : ५२३, दुसरा डाव : २२०
बातम्या आणखी आहेत...