आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेनीचे ‘रिफ्लेक्सेस’ आजही जगात सर्वाेत्तम : किरण माेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महेंद्रसिंग धाेनीचे ‘रिफ्लेक्सेस’ हे जगात सर्वाेत्तम असून त्याच्या बाॅल कलेक्शनचे प्रमाण ९० टक्के अाहे. हे जगातल्या काेणत्याही विकेट कीपरपेक्षा जास्त असल्याने धाेनीचे यष्टिरक्षण चांगले नाही, असा कुणी दावा करत असल्यास त्यात तथ्य नसल्याचे भारताचे माजी यष्टिरक्षक अाणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण माेरे यांनी नमूद केले.

नाशिकच्या कान्हेरे मैदानावर बडाेदा विरुद्ध उत्तर प्रदेशचा सामना पाहण्याच्या उद्देशाने अालेल्या किरण माेरे यांनी पत्रकारांशी मनमाेकळा संवाद साधला. या वेळी बाेलताना माेरे यांनी फलंदाजांप्रमाणे प्रत्येक यष्टिरक्षकाचीदेखील भिन्न शैली असल्याचे सांगितले. धाेनीची शैली पूर्णपणे वेगळी असून त्याचे रिफ्लेक्सेस इतरांच्या तुलनेत खूपच चांगले असल्यामुळे त्याला डाइव्ह मारण्याची फारशी वेळच येत नाही, असेही माेरे यांनी सांगितले.

आताचा भारतीय संघ दर्जेदार
सध्याच्या भारतीय संघात प्रत्येक जागेसाठी दुसऱ्या फलंदाज, गाेलंदाज अाणि यष्टिरक्षकाचा स्वतंत्र पर्याय उपलब्ध अाहे. भारतात एकाच वेळी ५ ते ६ दर्जेदार जलद गाेलंदाज असणे ही खूप माेठी गाेष्ट अाहे. इतकी चांगली बेंच स्ट्रेंथ असणे हे भारतातील क्रिकेटचा स्तर उंचावला असल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचेही भारताचे माजी यष्टीरक्षक किरण माेरे यांनी नमूद केले.

सचिनची सूचना अंडर १४, १६, १९ साठी उपयुक्त; फायदा होईल
सचिनने दाेन पीच अाणि दाेन भिन्न प्रकारच्या बाॅल्सवर सामने खेळवण्याची सूचना ही अंडर १४, अंडर १६ किंवा अंडर १९ साठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. तसेच क्रिकेटच्या ब्रेकदरम्यान अॅथलेटिक्सचे लहान इव्हेंट्स किंवा स्पर्धा भरवल्यास त्या खेळांनादेखील फायदा हाेऊ शकेल, असेही माेरे म्हणाले. सचिनने सुचवलेला प्रस्ताव खूप उपयुक्त असून क्रिकेटसह अन्य खेळांनाही त्यामुळे फायदा हाेऊ शकेल, असेही माेरे यांनी सांगितले.

पार्थिवचे ‘कमबॅक’ इतिहासात सर्वाेत्तम
काेणत्याही देशाच्या संघात पुनरागमन करणे खेळाडूसाठी खूप अवघड बाब असते. पार्थिव पटेलने तब्बल ८ वर्षांनी पुनरागमन करून खूप चांगला खेळ करून दाखवला. माझ्या दृष्टिकाेनातून हे भारतीय इतिहासातील सर्वाेत्तम ‘कमबॅक’ असल्याचे किरण माेरे यांनी सांगितले. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर कमबॅक करण्यासाठी तुमची मानसिक अवस्था अत्यंत सक्षम असावी लागते. पार्थिवने इतक्या वर्षांनी पुनरागमन करताना तितकीच चांगली कामगिरी करून दाखवली हे विशेष असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...