आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: भावाच्या प्रेरणेतून गाठला वर्ल्डकपचा पल्ला! स्मृतीची उल्लेखनीय कामगिरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- वडिलांच्या प्रबळ इच्छाशक्तीचे पाठबळ अाणि भावाची सर्वाेत्कृष्ट क्रिकेटर हाेण्यासाठीच्या प्रयत्नातून महाराष्ट्रालाच नव्हे तर टीम इंडियाला स्मृती मानधनाच्या रूपाने एक प्रतिभावंत युवा फलंदाज मिळाला. वडील व भावाच्या क्रिकेटसाठीच्या मेहनतीतून तिला प्रेरणा मिळाली व अल्पावधीत तिने देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी थेट वर्ल्डकपचा पल्ला यशस्वीपणे गाठला. पदार्पणातील वर्ल्डकपमध्ये शतकी खेळी करणारी मंगळवारी २१ व्या वर्षांत पदार्पण करत अाहे. तिचे अल्पावधीतील हे साेनेरी यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारे अाहे. तिचा भाऊ श्रावण महाराष्ट्राकडून खेळला अाहे.  

९ व्या वर्षी महाराष्ट्र टीममध्ये
भाऊ श्रावणची क्रिकेटपटू हाेण्यासाठीची मेहनत स्मृतीसाठी प्रेरणादायी ठरली. यातूनच तिने वयाच्या ९ व्या वर्षीच महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील मुलींच्या संघात स्थान मिळवले. या स्पर्धेदरम्यान तिने उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे तिला दाेन वर्षांत महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघातील अापले स्थान निश्चित करता अाले. तिने वयाच्या ११ व्या वर्षी टीममध्ये सहभाग घेतला. दरम्यान, तिने २०१३ मध्ये अांतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली. तिने २०१३ मध्ये वनडे अाणि २०१४ मध्ये कसाेटीमध्ये पदार्पण केले. 

हजार धावांच्या उंबरठ्यावर
महाराष्ट्राची युवा खेळाडू स्मृती  अाता वनडे करिअरमध्ये अापल्या नावे एक हजार धावा करण्यापासून काही अंतरावर अाहे.  तिने ३४ वनडेत अातापर्यंत एकूण ९२७ धावा काढल्या अाहेत. यात २ शतके अाणि ६ अर्धशतकांचा समावेश अाहे. यात एका वर्ल्डकप शतकाचाही समावेश अाहे. अाता  ७३ धावा काढून तिला वनडेतील एक हजार धावांचा पल्ला गाठता येईल. यादरम्यान ती माजी कर्णधार झुलन गाेस्वामीला (९३०) मागे टाकण्याची संधी अाहे.
बातम्या आणखी आहेत...