आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगाचा बादशाह उसैन बोल्ट जखमी, रिओ ऑलिंपिकमध्ये सहभाग अनिश्चित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुसैन बोल्ट... - Divya Marathi
हुसैन बोल्ट...
जमैका- जगातील सर्वात वेगवान धावपटू उसैन बोल्टने जमैकन ट्रॅक अॅंड फील्ड ट्रायलच्या 100 मीटर रेसच्या फायनलमध्ये सहभाग घेण्यास नकार दिला आहे. बोल्ट जखमी असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याला हॅमिस्ट्रिंग आहे. एवढेच नव्हे तर 6 ऑलिंपिक गोल्ड मेडल जिंकलेला हा धावपटू रविवारी होणा-या ऑलिंपिक क्वालिफाईंगच्या 200 मीटर रेसमध्ये सहभाग घेणार नाही. तो आतापर्यंत ऑलिंपिकसाठी अद्याप पात्र झालेला नाही. 100 मीटर धावण्यासाठी लागले 10.15 सेकंद...
- शुक्रवारी धावण्याच्या पहिल्या राऊंडमध्ये बोल्टने 10.15 सेकंदचा वेळ घेतला.
- 2016 मधील मागील 4 रेसमधील बोल्टची ही सर्वात खराब कामगिरी ठरली आहे. - बोल्टच्या नावावर 9.58 सेकंदात 100 मीटर रेस पूर्ण करण्याचा विश्व विक्रम आहे.
22 जुलैला लंडनला परतणार-
- बोल्टने सोशल साईटवर म्हटले आहे की, '' पहिल्या राऊंडच्या रात्री आणि नंतर सेमीफायनलनंतर मला हॅमिस्ट्रिंगमुळे अनकंफर्टेबल वाटत होते. आमच्या प्रमुख डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी 100 मीटर फर्राटा फायनल सोडून देत आहे.
- मला आशा आहे की, ट्रीटमेंट झाल्यानंतर 22 जुलै रोजी लंडन एनवर्सरी गेम्समध्ये मी पुन्हा एकदा धावेन. यामुळे मी रिओ ऑलिंपिक क्वालिफाईंगला पात्र होईन.
वेगाने धावायचे होते पण...
- बोल्टने सांगितले की, मी रेसमध्ये वेगाने धावू इच्छित होतो मात्र जखमेमुळे ते करू शकलो नाही. महिला गटात एलिन थॉम्पसन 10.70 सेकंदात फर्राटा चॅम्पियन बनत रिओसाठी पात्र ठरली.
- प्रेजर राइस 10.93 सेकंदासह दुस-या स्थानी तर 21 वर्षाची क्रिस्टिना विलियम्स 10.97 सेकंदात तिस-या स्थानावर राहिली.
पुढे वाचा, हुसैन बोल्टने लिहलेला संदेश....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...