आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Rio Olympics 2016: Meet Carolina Marin, Who Won Gold Medal Beat PV Sindhu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे स्पेनची ग्लॅमरस \'राणी\', जिने पूर्ण होऊ दिले नाही सिंधूचे स्वप्न!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीचवर आनंद लुटताना कॅरोलिना मारिन. दुस-या फोटोत व्बायफ्रेंडसोबत... - Divya Marathi
बीचवर आनंद लुटताना कॅरोलिना मारिन. दुस-या फोटोत व्बायफ्रेंडसोबत...
स्पोर्ट्स डेस्क- रिओ ऑलिंपिक-2016 मध्ये बॅडमिंटन महिला सिंगल इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल स्पेनच्या कॅरोलिना मारिनच्या नावावर राहिले. वर्ल्ड नंबर वन असलेल्या मारिनने पी व्ही सिंधूला कडव्या लढतीत 2-1 असे हरविले. कोर्टवर खूपच साधी राहणारी ही शटलर पर्सनल लाईफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. 23 वर्षाच्या मारिनच्या सोशल अकाउंटवर तिचे बरेचसे ग्लॅमरस फोटोज पडले आहेत. का म्हटले जाते 'गर्ल नदाल'...
- कॅरोलिना मारिन हिला स्पेनची गर्ल नदाल म्हटले जाते. याचे कारण आहे टेनिस स्टार राफेल नदाल.
- फुटबॉलसाठी स्वर्ग म्हटले जाणा-या स्पेनमध्ये रॅकेट गेम राफेल नदालमुळे प्रसिद्ध आहे.
- अशा देशात स्वत:च्या बळावर दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या कॅरोलिनासाठी हा प्रवास वाटतो तेवढा सहजसोपा नव्हता.
पुरुषांसोबत करते सराव-
- लहानपणी मारिनने फ्लॅमेन्सो डान्सचे ट्रेनिंग घेतले होते. एवढेच नव्हे तर स्पेनमध्ये बॅडमिंटन खेळले जात नसल्याने तिला पार्टनरही सहज मिळत नसे.
- या कारणामुळे तिला पुरुषांसोबत प्रॅक्टिस करावी लागत असे. याचा फायदा तिला असा होतो की सामना कितीही वेळ लांबला तरी ती थकत नाही.
स्पेनमधील लोक विचारतात, हे बॅडमिंटन काय असते?
- बॅडमिंटनबाबत स्पॅनिश लोकांना किती माहिती आहे याचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता की, एकदा मारिन दुस-या देशातून आपल्या मायदेशी परतत होती. त्यावेळी विमानतळावर तिच्या बॅगमधील रॅकेट पाहून विचारले की हे बॅडमिंटन काय आहे?
- मारिनने करिअरमधील आतापर्यंत 314 सामने खेळले आहेत. त्यातील तिने तब्बल 230 सामने जिंकले आहेत तर 74 सामने हारले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कॅरोलिना मारिनचे निवडक ग्लॅमरस फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...