आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ ऑलिम्पिकसाठी आता सचिन होऊ शकतो गुडविल अॅम्बेसेडर, कुणी पाठवले पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली. सचिन तेंडुलकर रिओ ओलिंपिकसाठी गुडविल अॅम्बेसेडर होऊ शकतो. या संदर्भात इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) त्याला पत्रही पाठवले आहे. शिवाय एआर रहेमानलाबरोबरदेखील गुडविल अॅम्बेसेडर होण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. या आधी 23 एप्रिलरोजी सलमान खानलाही ओलिम्पिकसाठी गुडविल अॅम्बेसेडर करण्यात आले आहे.
सलमानचा झाला होता विरोध...
- सलमानला गुडविल अॅम्बेसडर करण्यासाठी रेसलर योगेश्वर दत्तने विरोध केला होता.
- मिल्खासिंगांनी क्रीडा जगतातील एखाद्या व्यक्तीला अॅम्बेसेडर केले असते तर अधिक चांगले झाले असते. असे म्हणत सलमानचा विरोध केला होता.
- सलीम खान सलमानचा बचाव करताना म्हणाले होते की, मिल्खांसाठी बॉलीवुडनेही कॉन्ट्रीब्यूशन दिले आहे. अन्यथा लोक त्यांनाही विसरले असते.
मिल्खांनी सुचवली होती यांची नावे...
- मिल्खासिंग यांनी अॅम्बेसेडर करण्यासाठी काही नावेही सुचवली होती.
- मिल्खा म्हमाले होते की, दुसऱ्या कुणाला या पदावर नियुक्त करण्याचा काहीच संबंध येत नाही.
- जर, खरोखरच एखाद्या अॅम्बेसडरची आवश्यकता भासली तर, आपल्याकडे सचिन तेंडुलकर, पी टी ऊषा, अजीतपालसिंग, राज्यवर्धनसिंह राठौड सारखे दिग्गज खेळाडूही आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, Photos