आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rio Paralympics: Gold Mesalist Of London Olympic Marieke Vervoort Considering Euthanasia.

10 मिनिटेच झोपू शकते ही खेळाडू, रिओ पॅरालिंम्पिकनंतर तिला हवाय मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- बेल्जिमयची ही खेळाडू 2000 पासून म्हणजेच मागील 16 वर्षापासून हाडाच्या आजाराने त्रस्त आहे. - Divya Marathi
- बेल्जिमयची ही खेळाडू 2000 पासून म्हणजेच मागील 16 वर्षापासून हाडाच्या आजाराने त्रस्त आहे.
स्पोर्ट्स डेस्क- रिओ पॅरालिंपिक गेम्स सुरु झाले आहेत. तसेच तेथे असे काही खेळाडू सहभागी झाले आहेत जे या स्पर्धेनंतर मरण्याची वाट पाहत आहेत. ही इच्छा व्यक्त केली आहे बेल्झियमची खेळाडूट मारीके वेरवू्र्टने, जिला मणक्याच्या हाडाचा दुर्मिळ आजार आहे. ती रिओत गोल्ड मेडल जिंकल्यानंतर इच्छामृत्यू स्वीकारणार आहे. कोण आहे मारीके वेरवूर्ट...
- मारीके वेरवूर्ट बेल्झियमची पॅराट्रायथलॉन अॅथलीट आहे. जिला मणक्याच्या हाडाचा गंभीर आजार आहे व ज्याच्यावर उपचार नाहीत.
- या आजारामुळे तिला खूपच त्रास सहन करावा लागतो आणि तिचे संपूर्ण जीवन फक्त व्हीलचेयरवरच आहे.
- वेरवूर्ट 37 वर्षाची आहे. तिचा आजार किती गंभीर आहे याचा अंदाज आपण यावरून लावू शकता की तिला रात्री केवळ 10 मिनिटांचीच झोप लागते.
- तिची झोपच होत नसल्याने ती अनेकदा बेशुद्ध होऊन पडते.
- यामुळे आयुष्याला वैतागलेल्या मारीकेला इच्छामृत्यु हवा आहे. ज्याची परवानगी तिला तिच्या देशातील कायदा देतो.
- स्थानिक मीडियाशी बोलताना ती म्हणाली की, या पॅरालिंपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर इच्छा मृत्यु घेईल.
- बेल्झियमने वर्ष 2002 मध्ये इच्छामृत्युला कायदेशीर परवानगी दिली आहे. यासाठी तेथे तीन डॉक्टर्सची परवानगी घ्यावी लागते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रिओत सहभागी झालेल्या या दिव्यांग खेळाडू आणखी कोणत्या कोणत्या समस्यांना देत आहे तोंड....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...