आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rio Paralympics: Indias Thangavelu Wins Gold, Varun Bhati Bronze In High Jump

Rio Paralympics मध्ये भारताला दुहेरी यश, ऊंचउडीत मरियप्पनला गोल्ड तर वरुणला ब्राँझ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मरियप्पन थंगावेलुने गोल्ड तर वरुण सिंग भाटीने ब्राँझ मेडल जिंकले आहे. - Divya Marathi
मरियप्पन थंगावेलुने गोल्ड तर वरुण सिंग भाटीने ब्राँझ मेडल जिंकले आहे.
नवी दिल्ली- रिओ पॅरालिंपिकमध्ये हायजंप इव्हेंटमध्ये भारताला दुहेरी यश मिळाले. मरियप्पन थंगावेलुने गोल्ड तर वरुण सिंग भाटीने ब्राँझ मेडल जिंकले आहे. पॅरालिंपिकमधील हायजंपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा थंगावेलु भारताचा पहिला खेळाडू आहे. त्याने 1. 89 मीटर तर भाटीने 1.86 मीटर ऊंच उडी मारली. दरम्यान, मरियप्पनला तामिळनाडू सरकार 2 कोटी रूपये देईल अशी घोषणा मुख्यमंत्री जयललिता यांनी केली आहे. सरकारची घोषणा- गोल्ड जिंकणा-याला 75 लाख...
- केंद्र सरकार पॅरालिंपिकमध्ये गोल्ड जिंकणा-या खेळाडूला 75 लाख, सिल्वर जिंकणा-याला 50 लाख तर ब्राँझ विजेत्याला 30 लाख रुपये देण्याची घोषणा केली गेली आहे.
- थंगावेलु पॅरालिंपिकमध्ये गोल्ड जिंकणारा पहिला खेळाडू बनला आहे.
- याआधी मुरलीकांत पेटकर (स्वीमिंग, 1972 हायडेलबर्ग) आणि देवेंद्र झांझरिया (जेवलिन थ्रो, 2004 अथेन्स) ने गोल्ड जिंकले होते.
- पॅरालिंपिक गेम्समध्ये भारताची मेडल्स संख्या आता 10 इतकी झाली आहे. यात 3 गोल्ड, 3 सिल्वर आणि 4 ब्राँझ आहेत.
5 वर्षाचा असताना पायावरून बस गेली, तरीही हिंमत नाही राहिला-
- 20 वर्षाचा थंगावेलु तमिळनाडूतील सलेम जिल्ह्यातील पेरियावादगमपट्टी गावचा रहिवासी आहे.
- मीडिया रिपोर्टनुसार, 5 वर्षाचा असताना त्याच्या पायावरून बस गेली होती त्यात त्याने डावा पाय कायमचा गमावला होता.
- हा अपघात तो शाळेत जात असताना घडला व बस चालकाने चुकीच्या पद्धतीने टर्न घेत थंगावेलूच्या पायावर बस घातली.
- यानंतरही थंगावेलुने हार मानली नाही. त्याने हाय जंपिंग मध्ये करियर बनवले. आपल्या पहिल्या स्पर्धेत तो दुस-या स्थानावर राहिला.
- या वर्षी मार्च मध्ये थंगावेलुने ट्यूनीशियात IPC ग्रां प्री मध्ये 1.78 मीटर ऊंच उडी मारली. ऑलिंपिकमध्ये क्वालिफाय करण्यासाठी त्याला 1.60 मीटर उंच उडी मारायची होती. त्यामुळे तो सहज क्वालिफाय झाला.
पोलिओमुळे पाय गमावले तरीही बनला चॅम्पियन-
- लहानपणी पायाला पोलिओ झाल्याने 21 वर्षाच्या वरुणचा एक पाय पूर्णपणे बाद झाला. यानंतरही तो एक चॅम्पियन खेळाडू बनला.
- वरुण उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.
- 2014 मध्ये इंचियोन (दक्षिण कोरिया) मध्ये झालेल्या अशियन पॅरा गेम्समध्ये तो 5 व्या स्थानावर राहिला होता.
- 2014 मध्ये चायना ओपन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये वरुणने गोल्ड मेडल जिंकले होते.
पॉवरलिफ्टर फरमान बाशाचे पदक थोडक्यात हुकले-
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताचा पॉवरलिफ्टर फरमान बाशाचे पदक थोडक्यात हुकले. पुरुषांच्या 49 किलो वजन गटात तो चौथ्या स्थानावर राहिला. त्याने एकूण तीन प्रयत्नांत 140 किलो वजन उचलले, मात्र तो पदकापासून दूर राहिला. कोंग वान ली याने 181 किलो वजन उचलत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले. जॉर्डनच्या उमर करादा याने रौप्यपदक, तर हंगेरीच्या नंदोर तुंकेल याने कांस्यपदक जिंकले.
नेमबाज नरेश स्पर्धेबाहेर
नेमाबाजीत भारतीय खेळाडू नरेशने निराशाजनक कामगिरी केली. पात्रता फेरीत सर्व स्पर्धकांत तो शेवटच्या स्थानी राहिला. नरेशने एकूण 583 गुणांची कमाई केली.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, रिओ पॅरालिंपिकमधील क्षण...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...