आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायझिंग पुणेचा ‘सुपर’ विजय; बंगळुरू पराभूत, बेन स्टोक्स सामनावीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून रायझिंग पुणे सुपरजायंट्स टीम रविवारी अायपीएलमध्ये विजयी ट्रॅकवर परतली. पुणे टीमने अापल्या पाचव्या सामन्यात विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २७ धावांनी शानदार विजय संपादन केला. पुणे टीमचा लीगमधील हा दुसरा विजय ठरला. दुसरीकडे यजमान बंगळुरूला लीगमध्ये चाैथ्या पराभवाला सामाेरे जावे लागले.
 
प्रथम फलंदाजी करताना रायझिंग पुणे सुपरजायंट्सने ८ बाद १६१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात बंगळुरू टीमने घरच्या मैदानावर ९ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १३४ धावांपर्यंत मजल मारली. यजमानांकडून डिव्हिलर्सने २९, काेहलीने २८, केदारने १८ धावांची खेळी केली. मात्र, त्यांना पराभव टाळता अाला नाही.

नाणेफेक जिंकून राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणे (३०) अाणि राहुल त्रिपाठीने (३१) रायझिंग पुणे सुपरजायंट्सला दमदार सुरुवात करून दिली. या जाेडीने पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. दरम्यान, गत सामन्यातील हॅट‌्ट्रिकवीर बद्रीने ही जाेडी फाेडली. त्याने अजिंक्य रहाणेला त्रिफळाचीत केले. रहाणेने २५ चेंडूंत ५ चाैकारांच्या अाधारे ३० धावांची खेळी केली. त्यापाठाेपाठ पवन नेगीने राहुल त्रिपाठीला काेहलीकरवी झेलबाद केले.
 
धाेनी-स्मिथची भागीदारी : कर्णधार  स्मिथने धाेनीसाेबत संघाचा डाव सावरला. या दाेघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. वाॅटसनने धाेनीला त्रिफळाचीत करून संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. धाेनीने २५ चेंडूंत ३ चाैकार व एका षटकारासह २८ धावांचे याेगदान दिले. स्मिथने २७ धावा काढल्या.

शार्दूल, बेन स्टाेक्सचे प्रत्येकी ३ बळी
रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या विजयात बेन स्टाेक्स अाणि युवा गाेलंदाज शार्दूल ठाकूरने माेलाचे याेगदान दिले. या दाेघांनी धारदार गाेलंदाजी करताना बंगळुरूचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्यांनी  सामन्यात प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. स्टाेक्सने चार षटकांत १८ धावा देताना हे यश संपादन केले. शार्दूल ठाकूरने ४ षटकांत ३५ धावा देऊन ३ गडी बाद केले. जयदेव उनाडकतने २ अाणि इम्रान ताहिरने १ बळी घेतला.
बातम्या आणखी आहेत...