आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या इंडियन क्रिकेटरने शेअर केले प्रेग्नेंट पत्नीचे Photos, दिला हा मेसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पा लवकरच बाबा होणार आहे. त्याने त्याची पत्नी शीतलचे प्रेग्नेंसीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यासोबत रॉबिनने लिहिले आहे, 'आई बनण्याचा अभुतपूर्व आनंद कोणी घेत असेल तर ती शीतल आहे. माझ्या पत्नीच्या प्रेग्नेंसीच्या या सुंदर प्रवासाचा मला अभिमान आहे. माझी इच्छा आहे की तिने यावर एक पुस्तक लिहावे. यामुळे गर्भावस्थेदरम्यान विविध कारणांमुळे थोड्या घाबरलेल्या महिलांची मदत होईल.' 
 
7 वर्षे चालेल अफेअर, त्यानंतर झाले लग्न 
- उथप्पाची पत्नी देखील खेळाडू आहे. शीतल गौतम ही टेनिस स्टार आहे. 2016 मध्ये शीतल - उथप्पाचे लग्न झाले. याआधी 7 वर्षे त्यांचे अफेअर सुरु होते. 
- विशेष म्हणजे उथप्पा क्रिकेटनंतर चर्चेत आला तो त्याच्या लग्नाआधी असलेल्या अफेअरच्या चर्चेमुळे. 
 
2008 मध्ये सुरु झाले अफेअर 
- शीतल आणि उथप्पाचे अफेअर 2008 मध्ये सुरु झाले होते. मात्र शीतल कधीही क्रिकेट पाहाण्यासाठी स्टेडियममध्ये आल्याची दिसली नाही. 
- यांच्या अफेअरचा खुलासा जून 2014 मध्ये शीतलच्या बर्थडेचे फोटो रॉबिन उथप्पाने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर झाला होता. 
- या फोटोजमध्ये दोघे एकमेकांच्या एवढे जवळ होते की फॅन्सला यांच्या नात्याबद्दल वेगळे सांगण्याची गरज पडली नाही. 
बातम्या आणखी आहेत...