आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Roger Federer Wins The Wimbledon Mens Singles Title For An Historic Eighth Time

नवा इतिहास: स्विस किंग टेनिसस्टार राॅजर फेडररने अाठव्यांदा जिंकला विम्बल्डन किताब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- स्विस किंग राॅजर फेडररने रविवारी अाठव्यांदा विम्बल्डन किताब जिंकून नवा इतिहास रचला. अशा प्रकारे अाठ वेळा चॅम्पियनचा बहुमान पटकावणारा ताे जगातील पहिला टेनिसस्टार ठरला. त्याने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये क्राेएशियाच्या मरीन सिलीचचा पराभव केला. त्याने १ तास ४१ मिनिटांच्या रंगतदार लढतीत ६-३, ६-१, ६-४ ने राेमहर्षक विजय संपादन केला. या विजयासह त्याने अापल्या नावे १९ व्या ग्रँडस्लॅम किताबाची नाेंद केली. याशिवाय त्याने सत्रामध्ये दुसरे  ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावले.  सिलीचला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

राॅजर फेडररने सामन्यात ८ एेस मारले. त्या तुलनेत सिलीचला पाच एेस मारता अाले. फेडररने चांगली सुरुवात करताना ३६ मिनिटांत पहिला सेट सहज जिंकला. त्यानंतर त्याने २५ मिनिटांत दुसरा सेट जिंकून अाघाडीला मजबुत केले. दरम्यान सिलीचने पुनरागमन करताना तिसऱ्या सेटमध्ये शर्थीची झुंज दिली. त्यामुळे हा सेट ४० मिनिटे रंगला. मात्र, यात फेडरर वरचढ ठरला. त्याने  तिसरा सेट जिंकून क्राेएशियाच्या सिलीचला धूळ चारली. 

जगातील पहिला : १९ ग्रँडस्लॅम किताब विजेत्या राॅजर फेडररला १४० वर्षांच्या इतिहासामध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने  अाता अाठव्यांदा  विम्बल्डन किताब जिंकुन नवा इतिहास रचला. अाठ वेळा विम्बल्डन ट्राॅफी पटकावणारा ताे जगातील पहिला टेनिसपटू ठरला. त्याने सत्रात पहिल्या ग्रँडस्लॅम अाॅस्ट्रेलियन अाेपनचे विजेतेपद पटकावले हाेते. 

हा माझा शेवटचा सामना नव्हता. पुढच्या वर्षीही मी या ठिकाणी खेळणार अाहे.’
- राॅजर फेडरर
 
विक्रमी कामगिरी
१९ सर्वाधिक ग्रँडस्लॅम किताब जिंकणारा पुुरुष खेळाडू  
३०२ सर्वाधिक अाठवडे नंबर वन राहण्याचा विक्रम 
११ वेळा विम्बल्डनची फायनल गाठणारा एकमेव खेळाडू

राॅजर फेडररचे करिअरमधील १९ ग्रँडस्लॅम  
- ०८ विम्बल्डन : (२००३, २००४, २००५, २००६, २००७, २००९, २०१२, २०१७)  
- ०५ अाॅस्ट्रेलियन अाेपन : (२००४, २००६, २००७, २०१०, २०१७)  
- ०५ अमेरिकन अाेपन : (२००४, २००५, २००६, २००७, २००८)
- ०१ फ्रेंच अाेपन : (२००९), तसेच २००६-७-८-९ व २०११ मध्ये उपविजेता.

विम्बल्डनमध्ये ५ वर्षांनंतर चॅम्पियन
फेडररला अाठव्या  किताबासाठी  पाच वर्षांपर्यंत झुंज द्यावी लागली. दीर्घ प्रतीक्षेनंतर त्याने यंदा या स्पर्धेत पुुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्याने २०१२ मध्ये शेवटची विम्बल्डन ट्राॅफी पटकावली हाेती.

- ४१ वर्षानंतर फेडररने पहिल्यांदा काेणताही सेट न गमावता जिंकला अंतिम सामना, यापूर्वी १९७६ मध्ये ब्याेंज बाेर्गने असे केले हाेते
- २०१७ मध्ये दुसरा ग्रँडस्लॅम, यापूर्वी सत्रात अाॅस्ट्रेलियन अाेपनचा किताबही जिंकला.
- ३५ व्या वर्षी किताब जिंकणारा फेडरर अाेपन इरामध्ये सर्वात वयस्कर विम्बल्डन चॅम्पियन.
- ११ तास ३७ मिनिटे लागली फेडररला या स्पर्धेतील सात सामने जिंकण्यासाठी. फायनलमध्ये लागला सर्वात कमी वेळ.
- ६४ मिलियन डाॅलरची (४११ काेटी) वार्षिक कमाई, सर्वाधिक कमाई करणारा टेनिसस्टार.
 
हेही जरूर वाचा
>गायत्री चंदावरकर यांनी विम्बल्डन बादशहावर दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत लिहिलेला खास लेख