आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit Is Not Happy Wit Ton As India Lost The Match

संघाचा पराभव झाल्याने शतकाला अर्थ नाही : रोहित शर्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - मी कितीही शतके ठोकली तरीही संघाचा पराभव होत असेल तर या शतकांना काहीच अर्थ नाही, असे मत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले. रोहितच्या मागच्या तीन शतकांच्या वेळी भारताचा पराभव झाला हे विशेष.
मंगळवारी रोहितने १७१ धावा ठोकूनही भारताचा पराभव झाला. यावर रोहित म्हणाला, "मी चांगली फलंदाजी केली. हे शतक चांगले होते. सुरुवात चांगली झाली. मात्र, सामन्याचा शेवट अपेक्षेप्रमाणे झाला नाही. संघाचा पराभव होत असेल तर आपण किती धावा काढल्या याला अर्थ उरत नाही,' असे त्याने नमूद केले.
भारताला चांगली सुरुवात करून देणे ही वैयक्तिकरीत्या माझी जबाबदारी होती. यानंतर धावांचा फ्लो सुरू ठेवण्याचेही माझे काम होते. मी खेळताना शतकाचा विचार करीत नाही. संघाला चांगली सुरुवात करून देत स्ट्राइक रोटेट करण्यावर माझा जोर असतो. मी नैसर्गिक खेळ करून शतक ठोकले. मात्र, ते व्यर्थ ठरले, असेही रोहित म्हणाला.