आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामना हरलो तरी, आम्ही चांगले खेळलो- रोहित शर्माची मराठीतून फटकेबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईकर रोहित शर्माने मराठी भाषेत फाडफाड फटकेबाजी करत त्‍याच्‍या चाहत्‍यांना आकर्षित केले. ब्रिस्बेनच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्‍याआधी झालेल्‍या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला मराठीमध्‍ये प्रश्न विचारल्‍यावर त्‍याची थोडी अडचण झाली. मात्र, नंतर त्‍याने फाडफाड मराठीमध्‍ये बोलण्‍यास सुरूवात केली.
पत्रकार परिषदेत रोहितला त्‍याच्‍या खेळीबद्दल मराठीमधून प्रश्‍न विचारण्‍यात आला. सुरूवातीला तो थोडासा लाजला. पण नंतर मैदानात मोठ्या आत्‍मविश्‍वासाने फटकेबाजी करावी, तसा तो मराठीत बोलला.
काय म्‍हणाला रोहित शर्मा...
- मला असं वाटतं, केवळ टॅलेंट असून चालत नाही, तर त्यासाठी मेहनतीचीही गरज आहे.
- मी जेव्‍हापण बॅटिंग केली. मी, असा विचार नाही केला की, मी टॅलेंटेड आहे.
- टॅलेंट तुम्हांला एका ठिकाणावर नेऊन ठेवते. पण ते पुढे नेण्यासाठी कठोर मेहनतीची गरज असते.
- आम्ही सामना हरलो असलो तरी आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहे.
- आम्ही फक्त मधल्या ओव्हरमध्ये विकेट काढायला शिकले पाहिजे. मध्ये ब्रेकथ्रू घेतला पाहिजे.
- आम्‍ही मध्‍येच विकेट काढायला हवी होती. मात्र, आम्ही थोडं लटकलो.